आजरा बँकेची शाखा ना.म.जोशी मार्ग मुंबई .- नुतनीकरण केलेल्या शाखा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न.
आजरा. प्रतिनिधी.
दि. आजरा अर्बन को-ऑप बँक लि महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये कार्यरत असून बँकेचा एकूण व्यवसाय रुपये १२ शे कोटी असून बँकेच्या एकूण ३२ शाखा पैकी २५ शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत ना. म. जोशी मार्ग मुंबई ही शाखा १९७५ सालापासून कार्यरत आहे. आजरा बँक ही मल्टीस्टेट झाले असून शेड्युल्ड दर्जा प्राप्त करण्यासाठी बँकेचा व्यवसाय वाढविणे महत्त्वाचे आहे त्यासाठी सर्व सोयी युक्त असे प्रशस्त जागेमध्ये शाखा कार्यालयाचे नूतनीकरण केलेले आहे नूतनीकरण केलेल्या शाखा कार्यालयाचे उद्घाटन राधानगरी भुदरगड आजरा चे आमदार व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे चे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अजय चौधरी आमदार शिवडी विधानसभा, विठ्ठल भोसले उपाध्यक्ष मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक, विष्णू घुमरे संचालक मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या उपस्थित होते. त्यावेळी आम. श्री आबिटकर यांनी आजरा बँक ही आपल्या भागातील असून बँकेची प्रगती प्रशंसनीय असल्याचे आपल्या भाषणात गौरव उद्गार काढले. यावेळी उपस्थित पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले बँकेचे चेअरमन डॉ.अनिल देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत स्वागत करून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना सहा दशके सतत ऑडीट अ’ वर्ग व एन. पी. ए. ० ℅ असल्याचा उल्लेख केला. तसेच अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी माहिती देताना बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती दिली. तसेच प्रस्तावना व सूत्रसंचालन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले याप्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन किशोरी भुसारी सह सर्व संचालक उपस्थित होते.

