Homeकोंकण - ठाणेव्यंकटराव हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य. - शिवाजी गुरव यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम उत्साहात...

व्यंकटराव हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य. – शिवाजी गुरव यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

व्यंकटराव हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य. – शिवाजी गुरव यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा..व्यंकटराव प्रशालेचे प्राचार्य शिवाजी गुरव,सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न झाला. सदर कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी होते. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष आण्णासो पाटील, सेक्रेटरी एस.पी.कांबळे, खजिनदार एस.डी.चव्हाण,सर माजी प्राचार्य व संचालक .सुनील देसाई सर . पांडुरंग जाधव व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजराचे प्रभारी प्राचार्य एस.जी.खोराटे,सर पर्यवेक्षक आर.जी.कुंभार,सर भादवण हायस्कूलचे मुख्याध्यापक जी.वाय. देसाई, सर आदर्श हायस्कूल शिरसंगीचे मुख्याध्यापक शिवाजी बिद्रे,सर देवर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.सुभाष सावंत,सर श्री.सर माजी मुख्याध्यापक प्रकाश सावरतकर,सर माजी मुख्याध्यापक अशोक पाटील,सर माजी मुख्याध्यापक शंकर गिलबिले, सर, माजी शिक्षक व माजी सभापती भिकाजी गुरव,सर, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गणपती ढेकळे,सर, श्री. नाईक श्री.पटेकर, ए.के.पावले,सर यशस्वी उद्योजक. सचिन शिंपी सह मान्यवर उपस्थित होते .तसेच आजरा महाल अंतर्गत सर्व शाळांचे सर्व शिक्षक-शिक्षिका,कर्मचारी उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य एस.जी.खोराटे,सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संचालक सुनील देसाई,सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.त्यांनी प्रास्ताविकात प्राचार्य श्री.शिवाजी गुरव,सर यांचा शिक्षक ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास उलगडला.श्री.गुरव सर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले शिक्षक म्हणून त्यांनी आपला समाजजीवनात एक ठसा उमटवला.कोरोना महामारीत त्यांनी व्यंकटराव प्रशालेचे प्राचार्य त्यांनी विध्यार्थी व शाळेचा गुणवत्ता स्तर उंचावला. असे गौरव उद्गार त्यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले.
प्राचार्य श्री. गुरव,सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन .श्री.शिंपी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.तसेच त्यांच्या पत्नी सौ. सुमनताई गुरव मॅडम यांचाही सत्कार प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.व्ही.जे.शेलार मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी श्री.गुरव,सर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणाऱ्या .कृष्णा दावणे, सर लिखित शुभेच्छापर लेखाचे वाचन करण्यात आले. या प्रसंगी भिकाजी गुरव,सर यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य श्री. गुरव सर यांनी सामाजिक,शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला असे मत व्यक्त केले.
खजिनदार .एस.डी. चव्हाण,सर यांनी आपले मत व्यक्त केले.त्यांनी गुरव सर यांना शुभेच्छा देताना निवृत्तीनंतरही आपण वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्कारमूर्ती प्राचार्य गुरव,सर यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांनी संस्थेचे पदाधिकारी सहकारी शिक्षक, मित्रपरिवार यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले.तसेच आपल्या आयुष्याच्या जडणघडणीतील महत्त्वाचे टप्पे उपस्थितांसमोर मांडले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जयवंतराव शिंपी यांनी शिवाजी गुरव,सर यांनी अतिशय कठीण काळात शाळेचे जबाबदारी पार पाडली. त्यांच्या सामाजिक जीवनातील कार्याचे योगदान उपस्थितांसमोर मांडले.तसेच त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.आर.पी.होरटे, सर यांनी केले.तर आभार श्री.पी.व्ही.पाटील,सर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.