राजर्षी छत्रपती शाहू महाराज
स्मृती शताब्दी निमित्त होणार चित्रप्रदर्शन. – आजरा व्यंकटराव हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे. कलाशिक्षक कृष्णा दावणे. – यांचा चित्रप्रदर्शनात सहभाग.
आजरा. प्रतिनिधी.
राजाश्रय देऊन कोल्हापूरला कला पंढरी अशी बिरुदावली मिळवून देणाऱ्या रत्नपारखी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना रविवारी स्मृती शताब्दी निमित्त त्यानीच उभारलेल्या शाहू मिलमध्ये कोल्हापुरातील शंभर चित्रकार, शिल्पकारांनी एकत्र येऊन कलेची वंदना दिली .जानेमाने , नवोदित, हौशी कलाकार मग लहानग्यापासून ते ८४ वर्षाच्या वृद्धापर्यंतच्या कलाकारांनी सहभाग घेत कॅमलिन कंपनीने पुरवलेल्या रंग व कॅनवास वर कुंचल्याने शाहू महाराजांची बहु- विविध रूपे आणि त्यांनी उभारलेले वैभव साकारले. रंगरेषांच्या या मेळ्यात स्वतः जिल्हाधिकारी यांनी सहभागी कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० पुण्यतिथीनिमित्त कलाकाराकडून कृतज्ञतापर्वात नियोजित १०० चित्रकार व शिल्पकारांमध्ये आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा या प्रशालेतील कलाशिक्षक कृष्णा अंतराम दावणे यांना चित्र रेखाटण्याची संधी मिळाली हा आपला बहुमान आणि भाग्य समजून महाराजांच्या जीवन कार्याचा आढावा घेत त्यांचे हुबेहूब चित्र कॅनवासवर रेखाटण्यात त्यांना यश आले. जिल्हाधिकारी राहुल रेखावर आणि आयोजक तसेच ज्येष्ठ- श्रेष्ठ कलावंतांनी त्यांचा कलाकृतीचे कौतुक केले. या १०० चित्रांचे प्रदर्शन राजर्षी छत्रपती शाहू मिल कोल्हापूर
येथे ६ एप्रिल २०२२ पर्यंत सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनाचा कलाप्रेमी लाभ घ्यावा.