स्वामी विवेकानंद नागरी सह संस्थेच्यावतीने उभारण्यात आलेल्या लक्ष्मीदेवी उद्यानांचे लोकार्पण सोहळा.
आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सह पतसंस्थेच्या सुवर्णमहोत्सव निमित्त उभारण्यात आलेल्या लक्ष्मीदेवी उद्यानांचे दि. २८ रोजी सायं ५ वा. लोकार्पण सोहळा असून भाजप प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांत पाटील, माजी आम. सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके यांची प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन जनार्धन टोपले, व्हा. चेअरमन दयानंद भुसारी यांनी दिली यावेळी श्री टोपले म्हणाले
गुरुवारी सायंकाळी पाच वाजता कुंभार गल्ली लक्ष्मी देवी उद्यानस्थळी हा कार्यक्रम होणार आहे.
स्वामी विवेकानंदा पतसंस्था यांची आजरेकरांना सुवर्णमहोत्सव निमित्त भेट असल्याचे श्री टोपले यांनी बोलताना सांगितले या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवहन चेअरमन व्हा.चेअरमन संचालक मंडळ यांनी केले आहे.