….तर बायको नवऱ्याला पोटगी देणार. औरंगाबाद खंडपीठानं दिलेला ऐतिहासिक निर्णय नेमका काय आहे.- तो वाचा?
औरंगाबाद :- प्रतिनिधी.
पती आणि पत्नीच्या घटस्पोट होण्याच्या घटना नव्या नाहीत. घटस्फोटानंतर बहुतांशवेळी पतीला पत्नीला पोटगी द्यावी लागते. कोर्टानं दिलेले पोटगी संदर्भातले असे अनेक निर्णय याआधीही तुम्ही वाचलेले असतील.दरम्यान, आता समोर आलेल्या एका निर्णयात, चक्क पत्नीला आपल्या पतीला पोटगी द्यावी लागणार आहे. औरंगाबाद खंडपीठानं हा ऐतिहासिक निर्णय दिलंय.ज्ञपत्नी जर नोकरीला असेल आणि पतीकडे उत्पन्नाचं कोणतीह साधन नसेल, तर पत्नीला आपल्या पतीस पोटगी देणं क्रमप्राप्त असणार आहे. औरंगाबाद खंडपीठानं एका प्रकरणी सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे.
घटस्फोटानंतर नोकरी करणाऱ्या बायकोला आपल्या नवऱ्याला पोटगी द्यावी लागणार आहे. औरंगाबाद खंडपीठाआधी नांदेडच्या दिवाणी न्यायालयानं खरंतर हा निकाल दिला होता. या निकालाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आलं होत. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठानं नांदेडच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलाय.
प्रकरण काय?
सरकार नोकरीत असलेल्या एका बायकोनं घटस्फोट घेतला. मात्र या महिलेच्या पतीजवळ उत्पन्नाचं काहीच साधन नव्हतं. अशावेळी घटस्फोट झाल्यानंतर सरकारी नोकरी असलेल्या बायकोनेच उत्पन्नाचं कोणतंही साधन नसलेल्या नवऱ्याला पोटगीची रक्क आणि उदरनिर्वाहाचा खर्च करण्यासाठी पैसे द्यावेत, असं कोर्टानं म्हटलंय.दरम्यान, कोणताही हुकूमनाना करण्याच्या वेळी किंवा त्यानंतर पती किंवा पत्नी कायदेशीर कलमांच्या साहाय्यानं पोटगीसाठी अर्ज करुन शकतात, असंदेखील कोर्टानं म्हटलंय.दरम्यान, यानुसारच नांदेडच्या दिवाणी न्यायालयात देण्यात आल्लया निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आलं होतं. मात्र औरंगाबाद खंडपीठानं दिवाणी न्यायालयाचा निकाल कायम ठेवलाय. या निर्णयानुसार आता पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.