Homeकोंकण - ठाणेजनता गृहतारण संस्थेची १४० कोटीची उलाढाल. - अध्यक्ष मारुती मोरे.

जनता गृहतारण संस्थेची १४० कोटीची उलाढाल. – अध्यक्ष मारुती मोरे.

जनता गृहतारण संस्थेची १४० कोटीची उलाढाल. – अध्यक्ष मारुती मोरे.

आजरा. – प्रतिनिधी. ०८

आजरा येथील जनता गृहतारण संस्थेची १४० कोटीची उलाढाल झाली आहे. प्रत्येकाला स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते प्रत्यक्षात स्वप्न साकार करण्यासाठी जनता गृह तारण संस्था सभासदांच्या पाठीशी उभी आहे. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या विश्वासावर संस्थेचे १४० कोटीचा व्यवसाय केला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी दिली.
यावेळी अध्यक्ष श्री मोरे म्हणाले संस्थेकडे ६१ कोटी ७४ लाख ८२ हजार १११ रुपयाच्या ठेवी आहेत.
तर ३५ कोटी २४ लाख ७३ हजार २४० रुपयांचे कर्ज वाटप केले आहे संस्थेने २६ कोटी ६८ लाख २८ हजार ८७ रुपयांची गुंतवणूक केली आहे संस्थेला २१ लाख ४५ हजार २७२ रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. संस्थेच्या आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, कोल्हापूर व इचलकरंजी येथे शाखा आहेत. लवकरच संस्थेच्या सातारा, कराड, सांगली येथे नवीन शाखा सुरू करणार आहे. याकामी उपाध्यक्ष गणपतराव आरळगुंडकर संचालक प्रा. डॉ.अशोक बाचूळकर प्रा. डॉ. अशोक सादळे, प्रा. विनायक चव्हाण, बळवंत कडवाले, प्रा. मनोज देसाई, अॅ सुभाष डोंगरे, प्रा. डॉ. तानाजी कावळे डॉ. अंजनी देशपांडे, प्रा.लता शेटे, प्रा. नेहा पेडणेकर व्यवस्थापक मधुकर खवरे, प्रशासन अधिकारी मारुती कुंभार कर्मचारी यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती जनता ग्रहण संस्थेचे अध्यक्ष श्री मोरे यांनी दिली
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.