Homeकोंकण - ठाणेशरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा तीव्र निषेध. - आजरा तालुका राष्ट्रवादीची निषेध सभा.

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा तीव्र निषेध. – आजरा तालुका राष्ट्रवादीची निषेध सभा.

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा तीव्र निषेध. – आजरा तालुका राष्ट्रवादीची निषेध सभा.

आजरा. – प्रतिनिधी. ०८

राष्ट्रवादीचे अध्यक्ष देशाचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट असून हल्ला कोणी केला असावा हे लवकरच समजेल एस. टी. कर्मचाऱ्याच्या आडून हल्ला करत असून यामुळे शरद पवार यांची प्रतिमा कोणीही झाकाळू शकत नाही. घडलेला प्रकार हा लोकशाहीला काळिमा फासणारा आहे काल मा उच्च न्यायालयाचा निकाल लागला व एस टी कर्मचारी यांना कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले मा उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या जवळ जवळ सर्व मागण्या मान्य केल्यानंतर एस टी कर्मचारी यांनी गुलाल उधळून आझाद मैदान येथे जल्लोष साजरा केला मग आज असा काय साक्षत्कार घडला आणि ते पवार साहेबांच्या घरावर चालून गेले यामागे कोणता पक्ष आहे हे उभा महाराष्ट्र जाणतो सत्ता गेल्यामुळे भाजप ची मळमळ यातून बाहेर पडली कितीही काहीही झाले तरी पुरोगामी महाराष्ट्र असले प्रकार कदापि सहन करणार नाही आम्ही सर्वजण या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
ता. अध्यक्ष मुकुंदराव देसाई, तसेच वसंतराव धुरे, सुधीर देसाई, अल्बर्ट डिसोझा, उदयराज पवार, एम के देसाई,अनिकेत कवळेकर, राजू होलम, शुभम पाटील आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.