Homeकोंकण - ठाणेकोथरुडकरांनी लावले पोस्टर्स.- चंद्रकांतदादा पाटील परत या. -आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही.

कोथरुडकरांनी लावले पोस्टर्स.- चंद्रकांतदादा पाटील परत या. -आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही.

कोथरुडकरांनी लावले पोस्टर्स.- चंद्रकांतदादा पाटील परत या. –
आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही.

कोथरुड.- प्रतिनिधी.

दादा, एक महिना झाला, तुमचा शोध कुठेच लागत नाही. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या!आम्ही तुमची वाट पाहतोय! अशी पोस्टर्स पुणे शहरातील कोथरुड मतदारसंघातील आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने लागली आहेत.हे गेल्या काही महिन्यापासून हरवले आहेत. कोणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा,असेही यामध्ये म्हटले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने कोथरूड परिसरात ही पोस्टर्स लागली आहेत. पुणेरी स्टाईलने शहरात लागलेल्या या पोस्टर्समुळे चर्चेला उधाण आले आहे. कोल्हापूरमध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील प्रचाराचे असे पडसाद पुण्यातून उमटतायत. आज दिवसभर ही पोस्टर्स चर्चेचा विषय झाली होती. चंद्रकांत पाटील यांच्यासंबंधी ही पोस्टर्स जनतेने उत्स्फूर्तपणे लावली की कोथरूडमधील भाजपच्या काही इच्छुकांनी ही कुरघोडी केली याची चर्चा रंगली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.