Homeकोंकण - ठाणेआजरा अर्बन बँकेस १५ कोटी ०६ लाखाचा नफा. - चेअरमन डॉ. अनिल...

आजरा अर्बन बँकेस १५ कोटी ०६ लाखाचा नफा. – चेअरमन डॉ. अनिल देशपांडे.

आजरा अर्बन बँकेस १५ कोटी ०६ लाखाचा नफा. – चेअरमन डॉ. अनिल देशपांडे.

आजरा. – प्रतिनिधी. ०१

आजरा येथील आजरा अर्बन बँकेस नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांमध्ये आजरा बँकेने रु. ११६२.६२ कोटीचा व्यवसाय केला आहे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस बँकेकडे एकूण ठेवी रु ७२० कोटी ७५ लाख इतक्या झाल्या असून एकूण कर्ज पुरवठा रु ४४१ कोटी ८७ लाख इतका आहे. अर्थव्यवस्थेमधील मंदी असून देखील बँकेच्या व्यवसाय बुद्धीवर फारसा परिणाम झालेला नाही. आजरा बँक म्हणजेच विश्वास हा विश्वास सार्थ ठरवत ग्राहकांनी या आर्थिक वर्षाच्या बँकेकडे व्यक्तिगत ७० कोटी च्या ठेव मध्ये वृद्धी झाली आहे. तसेच या वर्षात शंभर कोटी इतक्या कर्जाचे वितरण केले आहे विशेष म्हणजे घर बांधकाम खरेदी यासाठी गरजू सभासदांना १५ कोटींची कर्जे ही कमी व्याज दराने उपलब्ध करून दिली आहेत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना या बँकांमधील सुरू असून त्या योजनेमध्ये खाते उद्योगाच्या संबंधित केंद्र शासनाचा अर्थसहाय्य याचा लाभ उद्योजकांनी घेतला आहे. राज्य शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत दिल्या जाणाऱ्या ० % व्याजदराच्या योजनेमध्ये १०० तरुण उद्योजकांनी लाभ घेतला आहे सर्व जगभर पुढच्या प्रभावामुळे व्यवहार थांबले होते. असे नसतानादेखील बँकेच्या सर्व संचालक आणि कर्मचारी यांनी केलेल्या अथक प्रयत्नाने बँकेचे निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण हे ०% झाले आहे अशी माहिती बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी माहिती दिली.
बँकेमध्ये सर्व डिजिटल सुविधा उपलब्ध असून पुढील महिन्यात यूपीआय सुविधादेखील उपलब्ध होणार आहे याचबरोबर सभासद यांचे आर्थिक ज्ञान वाढावे यासाठी विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन या आर्थिक वर्षात विविध ठिकाणी करण्यात येणार आहेत बँकेमध्ये छोट्या कर्जाच्या म्हणजे रुपये २५ लाख आतील एकूण कर्जाची प्रमाण हे ६८ टक्के इतके आहे.
कै. अण्णाभाऊंच्या मुळे छोट्या लोकांना आपल्या प्रापंचिक आणि व्यवसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी या बँकेची स्थापना केली आणि हेच या बँकेची वैशिष्ट्य आहे. आणि ही परंपरा आजदेखील विद्यमान संचालक मंडळाने राखली आहे. अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख या बँकेचे संचालक म्हणून अशोक चराटी यांची मार्गदर्शन या मार्गावर ध्येयप्राप्ती वाटचाल सुरू आहे.
अद्यावत, तंत्रज्ञान, समाधानी ग्राहक, आणि लोकहीताला प्राधान्यक्रम हे ध्येय समोर ठेवून आज आजरा अर्बन बँक कार्यरत आहे. या प्रयत्नाला सर्वांनी प्रतिसाद दिला असे आवाहन या निमित्ताने संस्था प्रमुख व बँकेचे संचालक श्री चराटी यांनी केले. याप्रसंगी व्हा. चेअरमन किशोरी भुसारी, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, प्रकाश वाटवे, डॉ. दीपक सातोसकर, रमेश कुरुणकर, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, प्रणिता केसरकर, शैला टोपले, अस्मिता सबनीस, सुनिल मगदूम, सूर्यकांत भोईटे, किरण पाटील, अॅ. सचिन इंजल, संजय चव्हाण मनोहर कावेरी, जयवंत खराडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रशांत गंभीर यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.