आजरा महाविद्यालयातील
प्रा. डॉ. राजीव सावंता कर्पे यांना पीएचडी प्रदान.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. राजीव सावंता कर्पे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान करणेत आली. राजीव कर्पे यांनी “म्यानेजमेंट ऑफ विल्ट ऑफ कोरेन्दर कॉजड बाय फुजारीयम ऑक्सीस्पोरम फॉरमी स्पेसीज कोरियान्द्री ” हा शोधप्रबंध शिवाजी विद्यापीठास सादर करण्यात आला होता. त्यांच्या प्रबंधामध्ये कोथिंबीर भाजीवरती पडणाऱ्या बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण करणे, वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा कोथिंबीरीच्या प्रतिकारशक्ती वरती होणारे परिणाम, बुरशींचे जैविक पद्धतीने नियंत्रणकरून कोथिंबीरीचे उत्पादन वाढवणे, स्थानिक वनस्पतींच्या आर्काने बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण करणे, शेतकऱ्यांनी बुरशीनाशके कशी हाताळावी इ. शोध प्रबंधामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये दहा शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या तीस ठिकाणी सेमिनार, कॉन्फरन्स व कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवला आहे. ते लाईफ सायन्समध्ये सेट परीक्षा उतीर्ण झाले आहेत. त्यांनी आजरा तालुक्यातील मातीचे परीक्षण करून त्याचा लघुप्रबंध यु.जी.सी. नवी दिल्ली ला सादर केला आहे. त्यांना पीएचडी साठी डॉ. टी. आर. कावळे व यशवंतराव चव्हाण इनस्टीत्युट ऑफ सायन्स, सातारा चे डॉ. ए. बी. पवार यांचे मार्गदर्शन मिळाले. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी, उपाध्यक्ष , विलास नाईक, सी.ई.ओ. डॉ.अनिल देशपांडे, सचिव, मा.रमेशअण्णा कुरुणकर, सर्व संचालक तसेच प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे व अधीक्षक श्री. योगेश पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले. प्रा. श्री कर्पे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

