Homeकोंकण - ठाणेआजरा कारखान्यात मार्फत ऊस उत्पादकता वाढ मेळाव्याचे आयोजन. - चेअरमन सुनिल शिंत्रे.

आजरा कारखान्यात मार्फत ऊस उत्पादकता वाढ मेळाव्याचे आयोजन. – चेअरमन सुनिल शिंत्रे.

आजरा कारखान्यात मार्फत ऊस उत्पादकता वाढ मेळाव्याचे आयोजन. – चेअरमन सुनिल शिंत्रे.

आजरा. – प्रतिनिधी. ३१.

आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ व कर्मचारी यांचे अथक परिश्रमातून गेली दोन वर्षे बंद असलेला आजरा कारखान्याचा हंगाम २०२१/२२ यशस्वीरित्या पार पडला कारखान्याने या हंगामात ३५००७४ में टन उसाचे गाळप करून ४३४६३६ क्विं.साखर उत्पादन करून सरासरी साखर उतारा १२.४२ टक्के इतका प्राप्त झाला आहे. कारखाना जिल्हा बँकेकडून व्यवस्थापनाने ताब्यात घेऊन कमी कालावधीत कारखान्याने उत्तम प्रतीचे गाळप केले त्याप्रमाणे पुढील काही वर्षात कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस उत्पादनात वाढ करून ऊस गाळपाच्या दृष्टीने कारखाना स्वावलंबी व्हावा. या दृष्टीने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे म्हणून कारखान्यामार्फत दि.३०/३/२०२२ ते १/४/२०२२ अखेर कारखाना कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या गावांमध्ये शिवारफेरी व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे चे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने – पाटील हे शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, पाणी नियोजन, पूर्ण ऊस जाती जैविक अन्नद्रव्य व खतांचे मात्रा त्याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शिवार भेटीमध्ये प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन माहिती घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटी व या मेळाव्यासाठी दिलेल्या तारखे प्रमाणे आपल्या जवळील कारखान्याच्या सेंटर ऑफिसशी संपर्क साधून आपण कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्याचे चेअरमन सुनील शिंत्रे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.