Homeकोंकण - ठाणेआजरा साखर वतीने मौजे देवर्डेत. - शिवार फेरी व शेतकरी मार्गदर्शन मेळावा...

आजरा साखर वतीने मौजे देवर्डेत. – शिवार फेरी व शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न.

आजरा साखर वतीने मौजे देवर्डेत. – शिवार फेरी व शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न.

आजरा. – प्रतिनिधी. ३१

आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामार्फत मौजे देवर्डे येथे कारखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऊस उत्पादन वाढ या अभियाना अंतर्गत देवर्डे ता. आजरा येथील बाबासो गणपती तानवडे यांच्या ऊस प्लॉटवर शिवार फेरी करण्यात आली त्यामध्ये व्ही एस आय चे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने – पाटील यांनी खोडवा व्यवस्थापन बाबत सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली त्यानंतर गावातील मंदिरांमध्ये शेतकरी मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच जी एम पाटील उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती चेअरमन सुनील शिंत्रे, कार्यकारी संचालक डॉ. टि. ए भोसले उपस्थित होते. सदर मेळाव्यामध्ये श्री माने – पाटील

यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केले तसेच उपस्थित शेतकरी आणि विचारलेल्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे देऊन शंकेचे निरसन केले सदर मेळाव्यासाठी कारखान्याचे ऊस विकास अधिकारी अरुण माडभगत व ऊस पुरवठा अधिकारी विठ्ठल पाटील व बाळासो तांबेकर तसेच शेती विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी शेतकरी बाबासो तानवडे, मुकुंद तानवडे, शामराव पाटील, पांडुरंग चाळके, संजय भोसले , पांडुरंग दळवी, अनील बोलके, जितेंद्र पवार, अंबाजी मळेकर, वसंत आढाव, निवृत्ती कांबळे, दिगंबर धुरी सह देवर्डे येथील व विभागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री माडभगत यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.