Homeकोंकण - ठाणेगावठी बनावटीचे दोन पिस्टल व २९ राऊंडसह सोलापूरच्या दोघांना.- आजरा पोलीसांनी घेतले...

गावठी बनावटीचे दोन पिस्टल व २९ राऊंडसह सोलापूरच्या दोघांना.- आजरा पोलीसांनी घेतले ताब्यात. गुन्हा दाखल.

गावठी बनावटीचे दोन पिस्टल व २९ राऊंडसह सोलापूरच्या दोघांना.- आजरा पोलीसांनी घेतले ताब्यात. गुन्हा दाखल.

आजरा. – प्रतिनिधी. ३०

बहिरेवाडी ता. आजरा येथे दि. ३० रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज यांच्या आदेशानुसार स पो. नि. हारुगडे आणि मा. SDPO ऑफीस स्टाफ व पोलीस ठाणे स्टाफ असे गांजा विरोधी पथकामध्ये कारवाई करीता भागामध्ये गस्त करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानुसार दोन इसम हे सोलापूर येथून गावठी बनावटीचे दोन पिस्टल व २९ राऊंडसह आजरा पोलीस ठाणे हद्दीतून जात असताना बहिरेवाडी येथे ताब्यात घेतले असून. या कारवाईत सद्दाम रशीद शेख वय २७ व शहानवाज अल्लाउद्दीन शेख वय १९ दोघे राहणार वीरवाडे बु. ता. माहोळ जि. सोलापूर या दोघांना ताब्यात घेण्यात आले रात्री उशिरा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आली अधिक तपास आजरा पोलिस स्टेशनचे स. पो. नि. सुनिल हारूगडे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.