शासनाच्या “प्रो रेटा” परीगणना समितीवर चंद्रशेखर फडणीस यांची निवड. – आजरा सुतगिरणी वतीने सत्कार संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा येथील अण्णा भाऊ सूतगिरणी समूहाचे सल्लागार व माजी कार्यकारी संचालक चंद्रशेखर फडणीस यांची शासनाच्या “प्रो रेटा” परीगणना समितीवर निवड झाल्याबद्दल सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी, व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे व सर्व संचालक यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला. यावेळी व्हा. चेअरमन श्री. देशपांडे म्हणाले श्री फडणीस यांच्या नियोजनामुळे आजरा सुतगिरण यशस्वीरित्या चालू आहे. यापूर्वी त्यांना राष्ट्रीय पातळीवर ती समितीवर जबाबदारी सोपवली होती. आता राज्यपातळीवर या समितीने त्यांची निवड केलेली आहे. यामुळे आजरा सूतगिरणीचा नावलौकिकात भर पडली आहे. सध्या सुतगिरण चालवत असताना कच्चा माल कापुस यांचे दर गगनाला पोचले आहेत त्यामुळे सुतगिरण चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे वास्त्रोउद्योग अडचणीत येत आहे. यासाठी हा व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी त्यांची या समितीमध्ये, निवड झाल्याने वस्त्रोद्योगात येणाऱ्या अडचणी बाबत भूमिका मांडणे सोपे जाणार आहे. असा विश्वास याप्रसंगी डॉ. श्री देशपांडे यांनी व्यक्त केला. यावेळी श्री फडणीस सत्काराला उत्तर देताना म्हणाले अण्णाभाऊ नी माझ्यावर जी कार्यकारी संचालक पासून सल्लागार म्हणून जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली आहे. यानंतर मला सूतगिरणीचे अध्यक्ष अन्नपूर्णा चराटी त्यांनी मायेचा हात सतत पाठीशी फिरवून अर्शिवाद दिले. तर अशोक अण्णा चराटी यांनी धडाडीचे नेतृत्व व धाडशी निर्णय घेण्याची क्षमता व्हा. चेअरमन यांचे कल्पक मार्गदर्शन, सर्व कामगार कार्यालयीन व्यवस्थापनाची साथ यामुळेच मला या यशापर्यंत पोहोचता आले तरीही संस्थेसाठी आपण ज्यावेळी मार्ग दर्शनासाठी बोलवाला त्यावेळी मी हजर असेन तसेच संचालक मंडळाने माझ्यावर टाकलेला विश्वास यामुळेच ही संस्था प्रगतिपथावर असल्याचे श्री फडणीस यांनी बोलताना म्हणाले.
यावेळी याप्रसंगी आजरा तालुका मेडिकल असोसिएशन च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर संदीप देशपांडे यांचा तसेच यांची तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी संचालक शंकर टोपले, नारायण मुरुकटे, जयसिंग देसाई, जी. एम. पाटील, शशिकांत सावंत, राजू पोतनीस, मालुताई शेवाळे, जनरल मॅनेजर अमोल वाघ, चीफ अकाउंटंट विष्णू पोवार, अधिकारी सचिन सटाले, आर. ए. पाटील राजेंद्र धुमाळ, शामली वाघ आदी उपस्थित होते.