Homeकोंकण - ठाणेप्रमोद सावंत घेणार दुसऱ्यादां मुख्यमंत्रिपदाची शपथ. -तर प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा आज...

प्रमोद सावंत घेणार दुसऱ्यादां मुख्यमंत्रिपदाची शपथ. -तर प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी. -पंतप्रधान मोदींसह राष्ट्रीय नेत्यांची मांदियाळी.

प्रमोद सावंत घेणार दुसऱ्यादां मुख्यमंत्रिपदाची शपथ. –
तर प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी. –
पंतप्रधान मोदींसह राष्ट्रीय नेत्यांची मांदियाळी.

पणजी :- प्रतिनिधी. २८

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. आज ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सकाळी 11 वाजता डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.तीनवेळा आमदार असलेले प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 20 जागा जिंकून पुन्हा सत्तेवर आणले. दरम्यान या शपथविधी सोहळ्याला 10 हजारांहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गोव्याचे मुख्यमंत्री राजभवन संकुलाबाहेर शपथ घेण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. 2012 मध्ये, मनोहर पर्रीकर यांनी पणजीच्या कम्पाल ग्राउंडवर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.

या सोहळ्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोवा निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस, प्रभारी सी. टी. रवी यांच्यासह भाजपशासीत नऊ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान उपस्थित राहण्याची ही गोव्याच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरणार आहे.यामुळे डॉ. सावंत यांचा शपथविधी सोहळा ऐतिहासिक ठरणार असल्याची चर्चा आहे, हा सोहळा सर्वांसाठी खुला असल्यामुळे या सोहळ्यास अंदाजे 10 हजारांपेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी केवळ गोवातूनच नव्हे तर, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली आदी राज्यातील लोक उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची सर्वतोपरी तयारी पक्षाने केली आहे.राजधानी पणजीच्या जवळील बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी गोव्यात दाखल झाले आहेत.मुख्यमंत्री डॉ. सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे, संघटनमंत्री सतीश धोंड यांच्या मार्गदर्शनाखाली शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. हा सोहळा न भूतो न ठरता न भविष्यति, व्हावा यासाठी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अहोरात्र काम करत आहेत.

गोवा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 18 दिवस झाले. देशातील 5 राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांत भाजपाने यश मिळवले. संपूर्ण देशासह गोव्यात होणारा शिगमोत्सव आणि होळी यामुळे इतर राज्यांतील शपथविधी सोहळा थोडा विलंबाने पार पडला. गोव्यातही शिगमोत्सवामुळे शपथविधी काहीसा उशिरा होत आहे.या निवडणुकीत गोमंतकीय जनतेने भाजपला विधानसभेच्या एकूण 40 पैकी 20 जागांवर विजयी केले असून, भाजपच्या सरकारला तीन अपक्ष आणि 2 आमदार असलेल्या मगो पक्षाने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्यातही पुढील पाच वर्षांसाठी भाजपचे डबल इंजिन सरकार कार्यरत राहणार आहे.गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या शपथविधी सोहळ्यास तत्कालीन उपराष्ट्रपती झाकीर हुसेन उपस्थित राहिले होते. तो सोहळा वगळता गेल्या 60 वर्षांत मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास राष्ट्रीय नेते किंवा मान्यवर उपस्थित नव्हते. म्हणूनच डॉ. सावंत यांचा शपथविधी सोहळा आगळा वेगळा ठरतो.

मंत्रिपदासाठी चर्चेतील नावे.

नियमानुसार मुख्यमंत्री वगळता 11 मंत्री घेण्याची संधी सरकारला आहे. मात्र, या 11 जागांसाठी 15 आमदार उत्सूक असल्याने नेमके कोणते निकष लावून मंत्रिपद दिले जाते हे कळण्यास मार्ग नाही. प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मंत्रिपद देण्याबाबत भाजपचे केंद्रातील नेते निर्णय घेतील, अशी सांगितले आहे. त्यामुळे भाजप सरकारमधील मंत्र्याची नावे दिल्लीत नक्की झाली असणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कोणाची वर्णी मंत्रिमंडळात असेल, ते शपथविधी सोहळ्यातच दिसणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे, निलेश काब्राल, बाबूश मोन्सेरात, रोहन खंवटे, सुभाष फळदेसाई व नीळकंठ हळर्णकर या भाजप आमदाराची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असून अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड व डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मगो आमदार सुदिन ढवळीकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.