Homeकोंकण - ठाणे२०२२ वर्षाचा ऋग्वेद पुरस्कार सुचिता पडळकर यांना जाहीर.

२०२२ वर्षाचा ऋग्वेद पुरस्कार सुचिता पडळकर यांना जाहीर.

२०२२ वर्षाचा ऋग्वेद पुरस्कार सुचिता पडळकर यांना जाहीर.

आजरा. प्रतिनिधी. २२

आजरा येथील चैतन्य सुजन व सेवा संस्थेने २०२२ या वर्षाच्या ऋग्वेद पुरस्कारासाठी सुचिता पडळकर कोल्हापूर यांची निवड केली आहे. पूर्ण प्राथमिक शिक्षण हा त्यांचा ध्यास आहे आणि विश्वास आहे. त्याचबरोबर अन्य पुरस्कारही जाहीर झाले आहेत. यामध्ये श्रीमंती तेरजा फास्कु फर्नांडिस जिल्ह्यातील गुणी शिक्षिका पुरस्कार सुरेखा भिकाजी कांबळे मुमेवाडी यांना तर ल. धो. पाटील गुणी शिक्षक पुरस्कार गजानन शंकर कवठणकर इटे, यांना तर शिक्षक सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सुधाकर कृष्णा सावंत कोल्हापूर यांना जाहीर झाला आहे. त्याचबरोबर महाविद्यालय गुणवंत शिक्षक म्हणून डॉ. सुरेश चव्हाण गडिंग्लज हायस्कूलमधील गुणी शिक्षक म्हणून संतोष पाटील गुणवंत अंगणवाडी सेविका म्हणून अनुसया नांदवडेकर वांटगी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याच वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी यांनी निवडलेल्या गुणवंत प्राथमिक शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये उषा आजगेकर आजरा, गुलनाझ बागवान शिरोळ, सुषमा माने हातकणंगले, विजय मिस्त्री कागल, किरण सुतार पन्हाळा, संजीवनी भोसले गडहिंग्लज, अनिल कांबळे शाहूवाडी, सारिका पाटील भुदरगड, राहुल भोसले करवीर, नंदकुमार बाविस्कर गगनबावडा, पांडुरंग भोसले राधानगरी, आणि सदानंद पाटील चंदगड या गौरव समारंभाचे अध्यक्षपद प्रा. डॉ. शिवशंकर उपासे हे भूषविणार आहेत. रविवार दि. २७ मार्च २०२२ रोजी दुपारी २.०० वाजता चैतन्य सांस्कृतिक सभागृह महाजन गल्ली आजरा येथे हा समारंभ होणार आहे. तरी शिक्षणप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ऋग्वेद मासिकाचे संस्थापक संपादक सुभाष विभुते, संपादक सुनील सुतार व चैतन्य संस्थेचे संतोष जाधव आणि खजिनदार डॉ. अंजली देशपांडे यांनी केले यावेळी प्रकाश पाटील, रवींद्र देसाई, बळवंत शिंत्रे श्रावण जाधव, मंजिरी येमगेकर, शामल हरेर, एकनाथ गिलबिले, उत्तम कोकितकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.