Homeकोंकण - ठाणेवन संरक्षण दिना. दिवशीच मडिलगे गळीगोप, हालेवाडी परिसरात आग… सगळीकडे वनवा.. -...

वन संरक्षण दिना. दिवशीच मडिलगे गळीगोप, हालेवाडी परिसरात आग… सगळीकडे वनवा.. – आग कोण लावतो याचाही शोध घेणे गरजेचे…..

वन संरक्षण दिना. दिवशीच मडिलगे गळीगोप, हालेवाडी परिसरात आग… सगळीकडे वनवा.. – आग कोण लावतो याचाही शोध घेणे गरजेचे …..

आजरा. – प्रतिनिधी.

वनसंरक्षण दिना दिवशी शेती परिसरात वनवा लागला आहे. यामध्ये हालेवाडी व मडिलगे गावचे सरपंच, उप सरपंच व ग्रामस्थांना लक्षात आणुन दिले जात आहे. आजरा – उत्तूर रस्त्याच्या पश्चिमेकडील भागांमध्ये, हालेवाडी पाट्या नजीकच्या खाजगी क्षेत्रात आग लागली आहे. तरी ही आग विझवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे आज दि २१ रोजी सकाळी ११:०० च्या दरम्यान लागलेली ही आग विझवण्यासाठी आर्दाळचे अमोल बांबरे व देवर्डे सरपंच इंजि.जी.एम. पाटील. काही शेतकरी व पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता श्री मतवाडकसो यांनी दोन /अडिज तासांचा प्रयत्न करुन पुर्वेकडील भागातील आग आटोक्यात आणण्यामध्ये यशस्वी झाली पण पश्चिमेकडील भागात अजूनही आग विझलेली नाही . डाग, गाऊलगोड शेत परिसरात ती आग बाळू जाधव, भाऊ पोवार, अंबाजी जाधव, बाळू पोवार, धोंडीबा पोवार असे अनेक या परिसरातील शेतकऱ्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न करत सायंकाळपर्यंत विजवली आहे. वन विभागाचे फाॅरेस्टर. न्हावी साहेब यांनाही याबाबतची माहिती त्यांच्या रेंज अधिकारी सौ़.डाके मॅडम यांचे वतीने देण्यात आली आहे. तरी सर्व सरपंच उपसरपंच यांनी फाॅरेस्ट विभागाचे अधिकारी यांचे मदतीने पुर्व भागातील आग थांबवण्यासाठी प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मडिलगे येथील गळीगोप ते डाग शेताकडे आलेला आगीचा वनवा आणि गवताच्या गंजीना भस्मसात करत पुढे जात होता. अखेर काही शेतकऱ्यांनी मिळून तो आटोक्यात आणला.
या लागलेल्या या आगीमध्ये शेतकऱ्यांचे झालेले नुकसान नुकसानाची नुकसान भरपाई पाहणी होऊन मिळावी अशी मागणी जळणग्रस्त शेतकर्‍यांची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.