विधिमंडळ, मंत्र्यांना माहिती दिली नाही, बीड नगरपालिकेचे चार अभियंते निलंबित; सीईओवरही कारवाई करा. – सभापतींचे आदेश.
मुंबई. – प्रतिनिधी.
विधिमंडळात गैरहजर राहून फोनवरही मंत्र्यांना माहिती न देणाऱ्या बीड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा खात्यातील चार अभियंत्यांवर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निरोप देऊनही बैठकीला गैरहजर राहणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर (सीईओ) निलंबनाची कारवाई करा, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले.
विनायक मेटे यांनी बीड नगरपालिकेच्या मुजोर अधिकाऱ्यांबाबत सभागृहाचे लक्षवेधीद्वारे लक्ष वेधले. बीड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा पाणीपुरवठ्याबाबतीत नागरिकांच्या जीवाशी खेळ चालला आहे. अनेक कामात भ्रष्टाचार सुरू असून नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून ते कार्यालयात सतत गैरहजर असतात. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ताकीद देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नसल्याचे मेटे यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बैठकीला निमंत्रण देऊनही हे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात हजर असतानाही बैठकीला आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई व्हावी, अशी मागणी सतीश चव्हाण यांनी केली.
अभियंत्यांनी मोबाईलही बंद ठेवले
विधिमंडळ, मंत्र्यांना माहिती दिली नाही, बीड नगरपालिकेचे चार अभियंते निलंबित; सीईओवरही कारवाई करा. – सभापतींचे आदेश.