आजरा मनसेने केला चक्काजाम रास्ता रोखो – जीवघेण्या खड्यात केले – वृक्षारोपण. – महामार्ग अधिकाऱ्यांचा केला निषेध.
आजरा. – प्रतिनिधी. २२
आजरा शहरातील आंबोली महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे हे ताबडतोड मुजवावे अन्यथा त्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून नॅशनल महामार्ग व्यवस्थापनाचा निषेध करण्यात येईल अशा अशयाचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले होते. या अनुषंगाने सोमवार दि. २१ रोजी आजरा आंबोली रोड रस्त्यावर बसून ठिया आंदोलन करत, घोषणांनी परिसर दणाणून सोडला व रस्त्यावर पडलेल्या भल्यामोठ्या खोट्या “गु ऐंरड” या नावाने संबोधले जाणाऱ्या आयुर्वेदिक वृक्षाचे वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले. सदर वृक्षाचे पान हे आयुर्वेदिक म्हणून डोक्यावर लावले जाते. या वृक्षाचे पान अधिकारी आणि डोकं ठेवून शांत डोक्याने विचार करावा व जीवघेणे खड्डे मुजवावे अशा प्रतिक्रिया मनसे पदाधिकारी यांनी यावेळी दिल्या. यावेळी नायब तहसीलदार डी.डी. कोळी यांनी आंदोलकांशी चर्चा करताना नॅशनल महामार्गाच्या अधिकाऱ्यांची भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कालांतराने आपण रजेवर असल्याचे संबंधित अधिकारी यांनी सांगितले यावेळी नायब तहसीलदार श्री कोळी यांनी आंदोलकांना शुक्रवार २५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून बैठक लावण्याची आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबले यावेळी बोलताना मनसे तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे म्हणाले या महामार्गाच्या प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देऊन भ्रमणध्वनीवरून संपर्क करून कोणत्याही पद्धतीचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. या जीवघेण्या खड्ड्यामध्ये अनेक जणांचा अपघात झाला आहे. तरीदेखील या पडलेल्या खड्ड्यांमुळे अधिकारी दुर्लक्ष करत असतात याचे नेमके कारण काय आहे हे जनतेसमोर स्पष्ट होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही आज या आयुर्वेदिक वृक्षाचे खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आहोत. व या नॅशनल हायवे अधिकाऱ्यांचा निषेध करत असल्याचे बोलताना सांगितले.

{ अर्धा तासाहून अधिक चाललेल्या या रस्ता रोको मुळे वाहतूक दोन्ही बाजूला ठप्प झाली होती. दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या असताना या वाहनातील असलेले प्रवासी देखील आंदोलनस्थळी पोहचुन आपल्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगत जीवघेणे खड्डे मुजवले पाहिजे आपली मागणी रास्त असल्याचे सांगत आंदोलनाला पाठिंबा दिला. कॉम्रेड शिवाजी गुरव यांनीही आंदोलनास पाठिंबा दिला. व आपले मत व्यक्त केले. }
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पुनम भादवणकर, ता. अध्यक्ष अनिल निऊगरे, ता. उपाध्यक्ष आनंदा घंटे, प्रकाश कांबळे, महिला आघाडी उपाध्यक्ष सरिता सावंत, नूतन आजरा शहर अध्यक्ष कुमार कांबळे, महिला आघाडी उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई , वि. सेना. ता. अध्यक्ष अश्विन राणे, तसेच अरुन देसाई, ओमकार माडभगत, प्रदीप पाटील तुषार येजरे, अमर आपके, अभिजीत पाटील, प्रशांत ठोंबरे, अनिकेत पाटील, अवधूत सासुलकर सह महिला आघाडी पदाधिकारी, मनसैनिक उपस्थित होते.