Homeकोंकण - ठाणेआजरा मलिग्रेत संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर व महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न....

आजरा मलिग्रेत संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर व महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. –

आजरा मलिग्रेत संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर व महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. –

आजरा. – प्रतिनिधी. १४

मलिग्रे ता. आजरा येथे जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रम व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार विकास अहिर ,डॉ.अर्जुन शिंदे, डॉ.माधुरी चौगुले, डॉ.राधीका जोशी, डॉ.विनायक पाटील, सरपंच शारदा गुरव मॅडम व उपसरपंच राजाराम नावलगी इतर पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.रविंद्र गुरव, मुख्याध्यापिका मनिषा सुतार लक्ष्मी कांबळे, राज्य सदस्या, संग्राम सावंत समन्वयक – युनियन शाळा व्यवस्थापनसमितीचे अध्यक्ष शिवाजी भुगुत्रे संजय घाटगे, संजय कांबळे, सर्कल प्रकाश जोशीलकर, कोतवाल नेताजी कांबळे, पोलीस पाटील मोहन सावंत यांच्या उपस्थितीत परिसरामध्ये झाडे लावून या कार्यक्रमाचे व मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन झाले.
प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे राजर्षी शाहू महाराजांचे पुस्तक देऊन व झाडं देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार युनियन, राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळ व महाराष्ट्र इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई तर्फे भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड आणि संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार श्री. अहिर बोलताना म्हणाले, जीवनामध्ये आरोग्य हा विषय खूप महत्वपूर्ण आहे या विषयासाठी महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन व राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळ महाराष्ट्र यांनी आयोजित केलेले हे शिबिर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. आरोग्यासाठी आपण वेळ राखून ठेवला पाहिजे. आरोग्याची तपासणी मोफत होत आहे. ही तुमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. डॉ.अर्जुन शिंदे म्हणाले, हा आम्ही काम तुमच्यासाठी ग्रामीण व दुर्गम भागात घेऊन आलो आहे त्याचा लाभ तुम्ही घ्याच पण इतरांनाही या याबाबत व शिबिरा बाबत माहिती द्या आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या तपासण्या होणं फार महत्त्वाची गोष्ट आहे.
या कार्यक्रमाची भूमिका संग्राम सावंत यांनी म्हणाले, आम्ही संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम व मोफत आरोग्य शिबिर हे घेऊन महिलांच्या आरोग्याची तपासणी व्हावा हा हेतू ठेवून महिलांचे जीवनमान वाढवण्यासाठी संघटना प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय घाटगे यांनी केली व आभार प्रदर्शन शिवाजी भुगुत्रे यांनी व्यक्त केले.
या शिबिराला मुक्ती संघर्ष समीती, ग्रामपंचायत मलिग्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र मलिग्रे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आले होता. यावेळी वेगवेगळ्या भागातून आलेल्या महिला उपस्थित होत्या. तसेच वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.