विविध कंपनीचा गुटखा पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थासह – सुमारे १६ लाख ३४ हजार रुपयाच्या मुद्देमालासह ताब्यात. – आजरा पोलिसाची कारवाई.
आजरा.-प्रतिनिधी.१४
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा वेळवट्टी फाट्यानजीक महाराष्ट्र शासनाचा प्रतिबंध असताना तंबाखूजन्य व नशीले पदार्थ जवळ बाळगणे वाहतूक करणे असा गुन्हा केल्याप्रकरणी पोलिसांनी बांदा येथील शीतल जनार्दन पाटील वय ४८ या व्यक्तीला वेळवटीफाट्या नजीक विविध कंपनीचा गुटखा पानमसाला असा सुमारे १६ लाख ३४ हजार रुपयाच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्यावर आजरा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की खबऱ्याकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पाटील हा विमल पान मसाला, केशरयुक्त गोवा गुटका, तंबाखूची पाकिटे असा मुद्देमाल मालवाहतूक गाडी क्रमांक. एम. एच. ०७ पी. ३४९३ नं असलेल्या गाडीतून घेऊन गोव्याच्या दिशेने चालला होता. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून वाहतूक करत असलेली चार चाकी अशोक लेलँड कंपनीची गाडी आजरा अंबोली वेळवटी फाट्यानजीक अडवून धरती घेतली असता त्यामध्ये सदर मुद्देमाल आढळून आला याबाबतची फिर्याद पांडुरंग गोविंद गुरव यांनी आजरा पोलिसात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारगुडे करत आहेत.