आजरा नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी संजीवनी संजय सावंत यांची बिनविरोध निवड.
आजरा. – प्रतिनिधी. १५ .
आजरा येथील नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी ताराराणी आघाडीच्या संजवणी संजय सावंत याची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीची अधिकृत घोषणा अध्यक्षस्थानी असलेल्या नगराध्यक्षा जोत्नस्ना चराटी यांनी केली यावेळी नगरसेवक अशोक चराटी यांनी नुतन उपनगराध्यक्ष सौ सावंत यांचे स्वागत करत आपल्या प्रभागातील प्रत्येक नगरसेवकाने कामे करून घ्यावी. कोरोना काळामध्ये प्रलंबित राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याबाबत सर्वच नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये फेरफटका मारून नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन व विकास कामासाठी प्रयत्न करावे असे यावेळी नगरसेवक श्री. चराटी यांनी शुभेच्छा देताना म्हणाले तसेच नगरसेवक विलास नाईक यांनीही नूतन उपनगराध्यक्ष सौ सावंत यांना शुभेच्छा दिल्या.


नुतन उपनगराध्यक्षा सौ. सावंत बोलताना म्हणाल्या मागील कार्यकालात प्रभागातील विकास कामासाठी प्रयत्न केला आहे यापुढेही प्रभागातील नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन विकास कामासाठी प्रयत्न करीन ज्यांच्यामुळे मी आज उभी आहे त्या सर्वांचे धन्यवाद असाच आशीर्वाद माझ्या सोबत सर्वांच्या राहावा असे बोलताना सौ सावंत म्हणाल्या यावेळी भगवा रक्षक तरुण मंडळाने फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करत यावेळी शहरातील तरुण मंडळे, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या निवडीमुळे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
या बिनविरोध निवडीसाठी मुख्याधिकारी वगळता सर्व नगरसेवक उपस्थित होते.