ग्रामविकासाच्या विविध योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोहचविणार…ना. हसन मुश्रीफ.
आजरा ( प्रतिनिधी )
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक घटक केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे. शासनाच्या अनेक योजना ग्रामीण भागात राबवून शेतकरी कसा समृद्ध होईल या कडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ कार्यरत आहे.असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कानोली येथील विविध विकासकामांच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम. राजेश पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक सरपंच राजेंद्र मुरुकटे यांनी केले गावातील १ कोटी २५लाख विकासकामे जलजीवन मिशन पाणी योजना,रस्ते कामांचा शुभारंभ मंत्री मुश्रीफ व मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना पुढे मुश्रीफ म्हणाले रस्ते ,गटारी पाणी योजना याबरोबरच ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी त्याचबरोबर विधवा निराधार अंध अपंग यांना मोठया पध्द्तीने कशी मदत होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. खत कंपन्या आणि मोठमोठे औद्योगिक प्रकल्प यांचे मार्फत शेष फंड लावून यासाठी काही मदत करता येईल का याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत.यापुढे एक गावही विकासापासून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही काम करू असे सांगितले. चंदगड आजरा गडहिंग्लज तालुक्याच्या विकासासाठी आमदार राजेश पाटील याच्यापाठीमागे हिमालयासारखे राहू अशी ग्वाही दिली.यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील यांनी मतदार संघातील विकासकामांचा आढावा घेतला .या विकासकामांसाठी मंत्री मुश्रीफ यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.यापुढेही मतदार संघात एक गावही विकासापासून वंचित राहणार नाही. अशी ग्वाही दिली.यावेळी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, गोकुळ संचालिका अंजनताई रेडकर, संग्रामसिंह कुपेकर व गावचे सेवानिवृत्त सनदी अधिकारी जे.टी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष मुकुंददादा देसाई, सभापती उदयदादा पवार,विष्णुपंत केसरकर, गडहिंग्लज जि. प.सदस्य सतीश पाटील,प्रकाश पताडे एम.के.देसाई, .अनिल फडके,राजाराम पाटील संभाजी पाटील यांच्यासह संभाजी आपगे,बाजीराव पाटील,पंडित पाटील, रमेश भोगण ,मनोहर सावरतकर, सुधीरकुमार पाटील,सागर पाटील,शिवाजी पाटील, यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.आभार पत्रकार सुभाष पाटील यांनी मानले..