‘शरद पवार व नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध.- असल्याचं वक्तव्य तर आमदार नितेश राणे व निलेश राणे या बंधूंवर आणखी एक गुन्हा दाखल
मुंबई:- प्रतिनिधी.
राणे पितापुत्र आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अलिकडे सातत्याने चर्चेत आलेले आहेत. इतकंच नव्हे त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर गुन्हे देखील नोंद झाले आहेत.त्यामुळे चौकशी, अटकेची शक्यता, अटक आणि त्यानंतर जामीनासाठीची पळापळ या घडामोडी राणे पिता-पुत्रांच्या बाबतीत घडताना दिसून येत आहेत. अलिकडेच दिशा सालियनबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौकशी केल्यानंतर आता राणेंवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी हा गुन्हा नारायण राणे यांचे दोन पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. खासदार निलेश नारायण राणे आणि आमदार नितेश नारायण राणे यांनी जाणीपूर्वक समाजामध्ये हिंदू-मुस्लिम अशी तेढ निर्माण करून दंगली घडतील, असं भाष्य केल्यामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचेही नाव दाऊद इब्राहिमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल आज मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी याबाबत तक्रार केली होती. काल शनिवारी उशीरा रात्री अनेक कलमांअंतर्गत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच आझाद मैदानावर भाषण करत असताना नितेश राणे म्हटलं होतं की, अनिल देशमुख मराठा समाजातून येतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होते आणि नवाब मलिक मुस्लीम समाजातून येत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं विधान केलं होतं. हे सगळं दाऊन इब्राहिमच्या सांगण्यावरुन होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. शरद पवारांनी हा राजीनामा घ्यायला हवा होता मात्र, शरद पवार यांचेही दाऊदशी संबंध असल्याने ते हा राजीनामा घेत नसल्याचं विधान त्यांनी केकलं होतं. तर दुसरीकडे निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांचे थेट दाऊदशी संबंध असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.