नवज्योतसिंग सिद्धूंनी मान्य केला पंजाबमधील पराभव; निकालांवर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!
पंजाब. वृत्तसंस्था. १०
पंजाबमध्ये काँग्रेसची मोठी पीछेहाट झाल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू म्हणतात, “लोकांचा आवाज हा देवाचा आवाज असतो…”
निवडणुकांच्या आधी जवळपास सहा महिने पंजाबमधील राजकारण काँग्रेसमधल्या अंतर्गत बंडाळीमुळे ढवळून निघालं होतं. नवज्योत सिंग सिद्धू यांची आक्रमक भूमिका, अमरिंदर सिंग यांचा राजीनामा आणि दुसऱ्या पक्षाची स्थापना, भाजपासोबत हातमिळवणी, चरणजीत सिंग चन्ना विरुद्ध सिद्धू असा थेट सामना यामुळे काँग्रेससमोर अनेक आव्हानं उभी राहिली होती. त्यामुळे काँग्रेससाठी पंजाब निवडणुकांचा पेपर कठीण ठरणार, अशी वर्तवण्यात आलेली शक्यता आता खरी ठरताना दिसू लागली आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या मतदानासाठी आज मतमोजणी होत असून संध्याकाळपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्येच पंजाबमध्ये काँग्रेसची मोठी पीछेहाट होऊन आम आदमी पक्षाकडे एकहाती सत्ता जाताना दिसू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षाचा पराभव मान्य करत उलट आम आदमी पक्षाचं अभिनंदन केलं आहे.नवज्योतसिंग सिद्धूंनी मान्य केला पंजाबमधील पराभव; निकालांवर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!