Homeकोंकण - ठाणेआजरा सुतगिरण गारमेंट विभाग येथे महिला दिनानिमित्त वृंदाताई कोहाळकर यांचे व्याख्यान संपन्न.

आजरा सुतगिरण गारमेंट विभाग येथे महिला दिनानिमित्त वृंदाताई कोहाळकर यांचे व्याख्यान संपन्न.

आजरा सुतगिरण गारमेंट विभाग येथे महिला दिनानिमित्त वृंदाताई कोहाळकर यांचे व्याख्यान संपन्न.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा येथील अण्णाभाऊ आजरा सूतगिरणी गारमेंट विभाग व सुतगिरणी येथील कर्मचारी यांचे जागतिक महिला दिनाचे निमित्ताने प्रख्यात योग प्रशिक्षिका वृंदाताई कोहाळकर यांचे व्याख्यान यांचे व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी होत्या.
सौ. कोहाळकर बोलताना म्हणाल्या महिला स्वतःच्या आरोग्याची काळजी अजिबात घेत नाहीत. त्यामुळे त्या विविध आजारांना बळी पडतात त्याकरिता प्रतिकारशक्ती वाढवणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. समतोल आहार तसेच व्यायाम अति आवश्यक आहे. आहारायाम विचारांमुळे आणि प्राणायाम हे आपल्यासाठी संजीवनी आहेत. शरीराचे मीटर कार्ड छान ठेवूया, डोळ्यांचे आजार पाठीचे कंबरेचे आजार या सध्या महिला वर्गात मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्या आहारामध्ये पालेभाज्या, फळे, ड्रायफ्रुट्सचा वापर करणे आवश्यक आहे. आपल्या शरीरामध्ये रक्ताच्या पेशी नियमितपणे तयार होत असतात. आपन आनंदी राहिल्यामुळे देखील आपण ईश्वराचे संपर्कात निरंतर राहू शकतो उत्तम संवाद मग तो घरी असेल तेव्हा समाजामध्ये असेल तर आपल्यासाठी चांगलाच असतो शरीर सदृढ असेल तर आपण आनंदी रहात असतो याकरता उत्तम आरोग्याबाबत जागरूक राहिले पाहिजे तसेच याप्रसंगी कोहाळकर यांनी सर्व महिलांसाठी म्युझिक योग प्रशिक्षण दिले. त्याप्रमाणे मेडिसिन्स देखील घेतल्या त्यामुळे महिलांकरता अत्यंत उत्साहपुर्ण पूर्ण कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाच्या प्रसंगी गारमेंट विभागाच्या प्रमुख शामली वाघ यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले तसेच सूतगिरणीचे अध्यक्ष श्रीमती चराटी यांनी महिला दिनाचे निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. महिला दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्या कोहाळकर, अध्यक्षा अन्नपूर्णा चाराटी व संचालिका मालुताई शेवाळे, मनीषा कुरुनकर, तसेच निलांबरी फडणीस, शामली वाघ यांच्यासह प्रोडक्शन कटिंग व फिनिशिंग विभागातील महिलांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सुतगिरणीचे पर्सनल ऑफिसर सचिन सटाले, स्टोअर्स परचेस ऑफिसर राजेंद्र धुमाळ, चीफ इंजिनियर आर. ए. पाटील यांच्यासह गारमेंट विभागाच्या तसेच सूतगिरणीच्या महिला व कर्मचारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला चव्हाण यांनी केले तर आभार शुभांगी होरंबळे यांनी मांनले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.