व्यंकटराव मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यदिन संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष, जि. प चे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे शुभहस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.. याप्रसंगी चर्चात्मक संवादात श्री. शिंपी यांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या एकंदरीत शैक्षणिक कारकीर्दीवर व दूरदृष्टीवर आपले विचार मांडले.. सावित्रीबाई फुले मराठी शिक्षण प्रसारक ,समाज सुधारक महिला होत्या, महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगाव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार केला काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पती-पत्नींचा जाहीर सत्कार मेजर कॅन्डी यांच्या हस्ते केला आणि शाळांना सरकारी अनुदान देऊ केले .त्यानंतर ही सावित्रीबाईंनी अर्थात पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले .त्यांनी ग्रहीणी नावाच्या मासिकात काही लेखही लिहिलेले आहेत सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्म दिन ‘बालिका दिन’ म्हणून साजरा केला जातो… अशा या महान शिक्षण उपासक व्यक्तिमत्वाचा आज स्मृतिदिन..त्यानंतर प्र. प्राचार्य एस. जी. खोराटे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दल आपले विचार मांडले.सांस्कृतिक विभाग प्रमुख पी व्ही पाटील, ज्येष्ठ शिक्षिका व संस्कृत अध्यापिका सौ एस.डी .इलगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले..
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष आण्णासो पाटील, सचिव एस. पी .कांबळे, प्रभारी प्राचार्य सुरेशराव खोराटे, पर्यवेक्षक राजेंद्र कुंभार, सर्व महिला शिक्षिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.