एसटी विलगीकरण संपामुळे ३ कोटी ९४ लाख २ हजार ३३२ रु नुकसान. – पं. स. मासिक सभेत आढावा.
( दि. १० पासून कोवाडे, पोळगाव, भावेवाडी, गावठाण फेऱ्या होणार सुरु. पंचवार्षिक पंचायत समिती शेवटची मासिक सभा संपन्न. )
आजरा. – प्रतिनिधी.
एसटी विलगीकरण संपामुळे ३ कोटी ९४ लाख २ हजार ३३२ रु नुकसान झाले असल्याचे पंचायत समिती मासिक सभेच्या आढावा बैठकीत आजरा आगार कार्यशाळा अधिकारी पृथीराज चव्हाण यांनी माहिती दिली दि. ९ रोजी आजरा पंचायत समिती सभागृहात मासिक सभा संपन्न झाली अध्यक्षस्थानी सभापती उदयराज पवार होते स्वागत गट विकास अधिकारी बि.डी.वाघ यांनी केले श्रद्धांजली व विविध अभिनंदनाचे ठराव सदस्य शिरिष देसाई यांनी मांडला यावेळी आढावा देताना आजरा आगाराचे श्री. चव्हाण म्हणाले दि. १० पासून कोवाडे, पोळगाव, भावेवाडी, गावठाण फेऱ्या सुरु होणार असुन १२२ दिवस सुरू असलेला कामगार संप यामध्ये आजपर्यंत ८४ पैकी २५ चालक तर ७३ पैकी २२ वाहक व व्यवस्थापण मधील १००% कामावर हजर असुन २५२ पैकी ६६ फेऱ्या सुरू आहेत. तसेच तालुका कृषी विभागांमध्ये अनेक नवीन योजना आलेल्या आहेत. या योजने साठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी मिळत आहे काही योजना ८० टक्के सबसीडी या योजनेचा आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी तालुका कृषी विभागाविभागातुन माहिती घ्यावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री मोमीन यांनी केले.
आजरा तालुका शिक्षण विभागामध्ये एकूण ६६ पदे रिक्त आहेत. शालेय पोषण आहार शिजवून देण्याबाबतच्या सूचना आलेले आहेत. तर विद्यार्थी आरोग्य तपासणी १४ हजार ३५६ म्हणजे १००% पूर्ण झाल्या आहेत. दि. १० /१५ मार्च १० वी १२ वी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर भरारी पथक तयार करण्यात आले आहेत यामध्ये तहसीलदार विस्ताराधिकारी व इतर अधिकारी यांचा समावेश आहे.
[ कुमार भवन आजरा. – या शाळेमध्ये नगरपंचायत अतिक्रमण करत असून या शाळेचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे. असा प्रश्न सभापती उदयराज पवार यांनी उपस्थित केला .- याबाबत शिक्षण अधिकारी श्री चंद्रमणी म्हणाले याबाबतची माहिती आम्ही जि.प. कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना दिलेली आहे. याबाबत सभापती श्री पवार म्हणाले की या इमारतीचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर असताना दुसऱ्याकडे बोट करू नका त्या कुमार भवन शाळेला तुम्ही तारेचे कंपाउंड करून घ्या किंवा मुलांसाठी खेळण्यासाठी खुले सोडा परंतु होत असलेली पार्किंगसह अतिक्रमण थांबले पाहिजेत नगरपंचायती पत्रव्यवहार करा. तुमच्या मालकीचे रक्षण कार्यकारी अधिकारी येऊन करतील का.? तुमची काही जबाबदारी आहे कि नाही.. लवकरच याबाबत कारवाई व्हावी. अशा सूचना पंचायत समिती सभागृहातून शिक्षण विभागाला देण्यात आल्या. व नगरपंचायत व्यवस्थापनाने कुमार भवन मध्ये होत असलेला हस्तक्षेप बंद करावा व पार्किंग करू नये अशा सूचना पंचायत समिती सभागृहात कडून देण्यात आल्या. ]
आजरा महावितरणला पालकमंत्री सतेज पाटील यांनी डी. पी. डी. सी मधुन भरघोस निधी दिल्याने सभागृहाच्या वतीने मंत्री श्री पाटील यांचा अभिनंदन ठराव मांडण्यात आला. मीटर दुरुस्ती तक्रार बाबत गावोगावी कॅम्प चालू असल्याचे श्री कमदगी यांनी सांगितले.
{ या मासिक सभेत यामागे पाच वर्षात विकास कामाबाबत व इतर घेण्यात आलेले निर्णय प्रशासकीय यंत्रणेने प्रशासन झाल्यानंतर रद्द करू नये अशी मागणी सदस्य शिरीष देसाई यांनी सभागृहात केली. }
यावेळी या मासिक सभेला काही विभागाचे खातेप्रमुख वगळता सर्व विभागाच्या खातेप्रमुख यांनी खाते निहाय माहिती दिली. व २०१७ ची पंचवार्षिक पंचायत समिती शेवटची मासिक सभा संपन्न झाली.
यावेळी सदस्या रचना होलम, वर्षा बागडी, यांनी प्रश्न उपस्थित केले उपसभापती वर्षा कांबळे यांनी आभार मानले.