आजरा मनसेने शेतकऱ्याच्या हस्ते केक कापून विविध उपक्रमाने केला पक्षाचा वर्धापन दिन साजरा. मनसेची स्थापना होऊन पंधरा वर्षे पूर्ण.
आजरा. प्रतिनिधी.
आजरा मनसेने शेतकऱ्याच्या हस्ते केक कापून विविध उपक्रमाने केला पक्षाचा वर्धापन दिन साजरा. मनसेने पक्षाचा वर्धापन दिन शेतकऱ्यांच्या हस्ते आजरा येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीजवळ केक कापून विविध उपक्रमांनी पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला.
वर्धापन दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना वंदन करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
तसेच चितळे येथील धनगर वाड्यावरील शाळेमध्ये शालेय उपयुक्त वस्तूंचे वाटप प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, ता. अध्यक्ष अनिल निऊगरे, महिला आघाडी उपाध्यक्ष पुनम भादवणकर, ता. अध्यक्ष सरीता सावंत, उपाध्याय तेजस्विनी देसाई, ता. उपाध्यक्ष आनंदा घंट्टे,
सचिव चंद्रकांत सांबरेकर, विद्यार्थी सेना अध्यक्ष अश्विन राणे सह सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष मनसे सैनिक उपस्थित होते.