Homeकोंकण - ठाणेचाफवडे येथील १५० घरांच्या खासबाब प्रस्तावाला मंजुरी. - डॉ.भारत पाटणकर, कॉ संपत...

चाफवडे येथील १५० घरांच्या खासबाब प्रस्तावाला मंजुरी. – डॉ.भारत पाटणकर, कॉ संपत देसाई – कार्याला यश.

चाफवडे येथील १५० घरांच्या खासबाब प्रस्तावाला मंजुरी. –
भारत पाटणकर, कॉ संपत देसाई – कार्याला यश.

आजरा. – प्रतिनिधी.०३

चाफवडे येथील १५० घरांच्या खासबाब प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून मार्च अखेर पर्यंत त्याचा मोबदला वाटप केला जाईल असा निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ भारत पाटणकर, कॉ संपत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या या बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, गडहिंग्लज प्रांत बाबासाहेब वाघमोडे, पुनर्वसन तहसीलदार पिलारे, तहसीलदार विकास अहिर, उपाभियंता राठोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


खासबाब प्रस्तावाच्या घरांच्या किमतीबरोबरच राहिलेली संकलन दुरुस्तीची प्रकरणे आठवड्यात पूर्ण करणे, गायरान जमीन वाटप झालेल्या लोकांचा आकार निश्चित करणे, ज्यांचे करार झाले आहेत त्यांना तातडीने पॅकेज वाटप, जमीन मागणी केलेल्या लोकांना जमीन वाटप, भूखंडांचे वाटप यासह अनेक बाबींच्यावर या बैठकीत निर्णय होऊन त्याचा कालबध्द कार्यक्रम ठरविण्यात आला. निर्वाहक क्षेत्र जास्त असल्यामुळे वगळण्यात आलेल्या आणि ज्यांची स्थळपाहणी केली आहे अशा आठ शेतकऱ्यांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असून तो लवकर मंजूर करण्याबाबत पाठपुरावा करून लवकर निर्णय दिला असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याबरोबरच ज्यांचे वैयक्तिक प्रश्न आहेत त्याबाबत प्रांताधिकारी स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या स्तरावर निर्णय करतील असेही ठरले. लाभक्षेत्रात जमीन वाटप केलेल्या शेतकऱ्यांना जमीन कसण्यासाठी रस्ता देण्याबाबत तहसीलादर आजरा यांना सूचना देण्यात आल्या.
बैठकीला दशरथ घुरे, विष्णू मांजरेकर, विजय पाटील, परसु तरडेकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.