Homeकोंकण - ठाणेसमाजकारण सोबत अर्थकारणाला गती देण्याचे काम समस्त आजरेकरांनी केले- माजी खास. धनंजय...

समाजकारण सोबत अर्थकारणाला गती देण्याचे काम समस्त आजरेकरांनी केले- माजी खास. धनंजय महाडिक.{ दि. २ मार्च २०२२ रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण.- निमित्त.- बोधचिन्हाचे अनावरण. }

समाजकारण सोबत अर्थकारणाला गती देण्याचे काम समस्त आजरेकरांनी केले- माजी खास. धनंजय महाडिक.
{ दि. २ मार्च २०२२ रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण.- निमित्त.- बोधचिन्हाचे अनावरण. }

आजरा. – प्रतिनिधी. ०२

समाजकार्यासोबत अर्थकारणाला गती देण्याचे काम समस्त आजरेकर यांनी केल्याने सहकाराला गती मिळाली माजी खास. धनंजय महाडिक यांनी स्वामी विवेकानंद पतसंस्था मर्यादित आजरा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते .

संस्थेचा दि. २/३/२०२२ पासून सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण निमित्ताने सुवर्णमहोत्सवी शुभारंभ प्रसंगी बोधचिन्ह अनावरण कार्यक्रम आजरा येथे श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे बुधवार दि. २/३/२०२२ रोजी सकाळी ठीक १० वा. संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आम. प्रकाश आबिटकर, आजरा शहराच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराठी व संस्थेचे मार्गदर्शक महादेव ऊर्फ बापू टोपले यांचे प्रमुख उपस्थितीत संस्थेचे संस्थापक सभासद ग्राहक, हितचिंतक, संचालक मंडळ, व कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. श्री. खास महाडिक पुढे म्हणाले स्वामी विवेकानंद पतसंस्थेने तालुक्याची विश्‍वासार्हता जपली आहे. अलीकडे बँक कर्ज घेण्यासाठी सेव्हिल तपासलं जातं परंतु पतसंस्था यांना सिव्हिलची गरज नसते सामाजिक बांधिलकी व व्यवहार आपलेपणा बघून पतसंस्था नागरिकांना कर्ज देते ही एक विश्वासार्हता आहे. आजरासह राज्यामध्ये या पतसंस्थेने ही जी सामाजिक बांधिलकी जपली आहे. ती महत्त्वाची आहे. सामान्य माणूस संस्थेचा मालक असतो व सामान्य सभासदाचा आज या स्वामी विवेकानंद संस्थेने मान ठेवला आहे. असे म्हणाले व संस्थेला श्री महाडिक यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आम. प्रकाश आबिटकर म्हणाले आजरा तालुक्यातील सर्व संस्था उत्कृष्ट काम करत आहेत. तर या संस्थेचे काम आदर्शवत आहे. महाराष्ट्रातील एकुन संस्था मध्ये आजरा मधील संस्थेने गती देण्याचे काम केले आहे. या संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी प्रास्ताविक चेअरमन जितेंद्र टोपले यांनी केले. श्री. टोपले बोलताना म्हणाले एकीकडे आपला भारत देश स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपल्या स्वामी विवेकानंद व संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाचा प्रारंभ होत आहे. या दुग्धशर्करा योग आहे. आणि हिरण्यकेशी च्या नदीच्या काठावर वसलेल्या देश आणि कोकणामधील दुवा असलेल्या माझ्या या आजारांमध्ये ग्रामदैवत रवळनाथाच्या आशीर्वाद घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाचा कार्यकर्त्यांनी सामान्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प सोडला ज्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला एक हजार रुपये रोख देवाण-घेवाण करणे शक्य नव्हते अशा परिस्थितीत त्यांचा हा संकल्प सिद्धीस जाणे सोपी गोष्ट नव्हती. तात्कालीन राजकीय परिस्थिती यामध्ये अडचण झाली त्यामुळे संकल्पना प्रत्यक्षात संस्थेची स्थापना होण्यासाठी तीन वर्षे गेली तरी नोंदणीसाठी दहा हजार रुपयांची रक्कम गोळा करताना संस्थापकांना कर्ज काढावी लागली पण त्यांचे हे विधान स्वप्न दोन मार्च १९७३ रोजी वास्तव्यात आली आणि आजच्या या शुभ घडीला पाया ४९ वर्षांपूर्वी लागला गेला होता. कै. कृष्णाजी दत्तात्रय मायदेव, गोविंद रामचंद्र कोंडकर, विश्वनाथ रामचंद्र पेंडसे, दत्तात्रय दाजी येसने, गणेश लक्ष्मण नुलकर, शंकर रामचंद्र तुरंबेकर, अन्नपूर्णा कृष्णाजी मायदेव, विष्णुपंत गुंडोपंत कारेकर, जगन्नाथ शंकरलाल चिंडल, विठ्ठल बाळा नार्वेकर, बाळकुम दाजी येसने, दिगवंत ज्येष्ठ नेते कै बाबुरावजी कुंभार, श्रीहरी शंकराव नार्वेकर श्री तुकाराम रामचंद्र कोटकर ,श्री काशिनाथ तेंडुलकर, श्री. सुभाष नलवडे, महादेव ऊर्फ बापू टोपले आणि १५३ संस्थापक सभासद या सर्वांनी मिळून स्वामी विवेकानंद संस्थेचे वाढवले सभासदांचा विश्वास आपलं स्वतः प्रेमाचं सिंचन या बळावर या योजनेच्या रोपट्याचे आता विशाल वटवृक्ष होऊ पहात आहे.

आज संस्थेच्या मुख्य कार्यालयासह आजरा भादवण, बांदा, मुंबई सावंतवाडी, वेंगुर्ला, आझाद मैदान, कोल्हापूर व कसबा घेत कोल्हापूर अशा एकूण नऊ शाखा कार्यरत आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर सिंधुदुर्ग व मुंबई जिल्हा असे तीन जिल्हा कार्यक्षेत्र असून राज्यस्तरीय संस्था ते माका मध्ये सर्व सभासदांच्या सदैव सेवेत कार्यरत आहेत संस्थेचा हा पन्नास वर्षाचा प्रवास म्हणजे केवळ बदललेली कॅलेंडरची पाने नसून नित्य नव्या आव्हानांना तोंड देत सर्वोत्तम ध्यास घेऊन केलेली साधना आहे. ज्या काळात पत संस्था सुरू झाली तेव्हा प्रत्येक पावलावर सर्वसामान्यांना पैशाची चणचण होती नोकरदारांचे पगार कमी होते. व्यापारउदीम वाढलेली नव्हता शेतीमधून ही उत्पन्नाचा मर्यादा होत्या अशा काळात विवेकानंद संस्थेने उद्योग सुरू करण्यासाठी व्यापार सुरू करण्यासाठी घरातील मंगल कार्यासाठी कोणाच्या शिक्षणासाठी तर कोणाच्या शेतीसाठी कर्ज देऊन योग्य वेळी आर्थिक पाठबळ दिले आणि आज अशी हजारो कुटुंबे आपल्याला आपल्याला ठिकाणी प्रगतीची शिखरे काढून स्थिरस्थावर झाले आहेत. त्याचे आम्हा सर्वांना प्रचंड समाधान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून कार्यरत असणाऱ्या या संस्थेचे आजपर्यंत आरोग्य शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करून आज पाचवी ते बारावी पर्यंत हजार विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याची कामगिरी आमच्या पंडित दीनदयाळ माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सुरू आहे. याचे उत्तम कारभाराची प्रचिती म्हणून नागपूर येथील नचिकेत प्रकाशक बेगो सर्वोत्तम सेवाकार्य पुरस्काराने गौरवण्यात आले. व्यवस्थापक अर्जुन कुंभार यांना मिळालेल्या उत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्काराची संस्थेचे नाव लौकिक भर पडली आहेत. संस्थेच्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना पिण्याचे पाण्याची सुविधा शहीद जवानांना कुटुंबांना आर्थिक मदत गरजू महिलांना आर्थिक उन्नतीसाठी कर्जसुविधा अतिवृष्टीमुळे विशेषता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली अशा प्रसंगी संसार उभे करण्यासाठी त्यांच्या पुनर्वसनासाठी व होईल यासाठी सागर मास्क पुरवठा असे सामाजिक बांधिलकी म्हणून आर्थिक मदत करण्यात आली यासाठी या पुढच्या काळात तुम्हा सर्वांचे असेच पाठवले आमच्या पाठीशी राहू दे अशी अपेक्षा व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. संस्थेचे जाहीर केलेल्या दोन नवीन सुवर्णमहोत्सवी ठेवू योजनेचा लाभ घ्यावा असे. अवाहन संस्थेचे चेअरमन जनार्दन टोपले यांनी यावेळी केले. या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचेआभार व्हा. चेअरमन दयानंद भुसारी यांनी केले. तर सुत्रसंचलन पत्रकार समीर देशपांडे यांनी केले. या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी सर्व संचालक, कामगार व्यवस्थापन यांनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने सभासद नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.