स्वामी विवेकानंद नागरी सह.पतसंस्था.मर्या. आजरा. शाखा. – पेरणोली सुवर्णमहोत्सवी वर्ष शुभारंभ संपन्न.
आजरा. प्रतिनिधी.
स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आजरा शाखा पेरणोली सुवर्ण महोत्सव शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती उदयराज पवार तर प्रमुख पाहुणे संपतराव देसाई होते. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले प्रमुख उपस्थित राजेंद्र सावंत,श्रीपतराव देसाई, तानाजी देसाई, सरपंच उषा जाधव, तसेच मनीषा गुरव, कामिनी पाटील, भारती कांबळे, यांचा संस्थेचे सल्लागार आनंदा मस्कर, शंकर नावलकर पांडुरंग,परीट, शंकर हाळवणकर, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शाखा व्यवस्थापन मारुती पाटील यांनी प्रास्ताविक केले ते बोलताना म्हणाले शाखेने गेल्या ३७ वर्षात या पंचक्रोशीतील पेरणीस हरपवडे साळगाव, कोरीवडे, हरपवडे या गावातील शेतकरी व सामान्य माणसांना दिलेली सेवा नवीन बचत गट योजना विषयी व संस्थेच्या प्रगतीचा आढावा व्यक्ती दिला सुवर्णमहोत्सव दिनाचे औचित्य साधत माजी ज्येष्ठ सल्लागार कृष्णा रायकर, राम भंडारी, सदाशिव देसाई, तसेच सरपंच वैशाली गुरव, पूजा कांबळे, रेश्मा पाटील, सुनील देसाई तसेच पेरणोली शाखेतील ज्येष्ठ सभासद महादेव येरुडकर, महादेव हळवणकर, ज्ञानोबा वांद्रे, शंकर घुरे या सभासदांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संपत देसाई, तानाजी देसाई, मनीषा गुरव, यांनी स्वामी विवेकानंद संस्थेचे मागील पाच दशकांतील सामान्य माणसांसाठी शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल संस्थेच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पेरणोली शाखा स्थापन करून या पंचक्रोशीतील शेतकरी सामान्य नागरिक यांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या आजरा साखर कारखाना सुरू व्हावा म्हणून पहिले योगदान या संस्थेने देऊन आपली सामाजिक जबाबदारी दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद दिले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सभासद ठेवीदार ग्राहक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोहिते यांनी केले तर आभार व्यवस्थापक मारुती पाटील यांनी मानले.
