आजरा ता.२७ (प्रतिनिधी)
भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य -एका मताचे सामर्थ्य ” या विषयांवर राष्ट्रीय स्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा, आणि भित्तिचित्र स्पर्धा आयोजित केल्या असून ही स्पर्धा खुली असून आजरा तालुक्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन आजरा तहसीलदार विकास अहिर, निवडणूक नायब तहसीलदार डि. डि. कोळी यांनी केले आहे. या पाच स्पर्धा संस्थात्मक श्रेणी, व्यावसायिक श्रेणी व हौशी श्रेणी अशा तीन श्रेणीत होणार आहेत, गीत,व्हिडीओ मेकिंग व भित्तिचित्र स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना एक लाखापासन दहा हजारापर्यंत तसेच विशेष उल्लेखनीय बक्षिसे देणेत येणार आहेत, घोषवाक्य स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना रुपये २०,०००,रुपये१०,००० रुपये ७,५०० व सहभागी ५० स्पर्धकांना प्रत्येकी रुपये २,००० विशेष उल्लेखनीय पुरस्कार देणेत येतील, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना भारत निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू व तिसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना इ-प्रमाणपत्र देणेत येणार आहेत.अधिक माहितीसाठी व
स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी https://ecisweep.nic.in/contest या संकेतस्थळावर भेट द्यावी व दिनांक१५ मार्च २०२२ पर्यंत voter-contest@eci.gov.in वर नाव नोंदणी करण्याचे आवाहन आजरा तहसिलदार विकास अहिर, व निवडणूक नायब तहसिलदार डि. डि कोळी यांनी केले आहे.