आजरा रामतीर्थ यात्रा रद्द .- तर इथून पुढे कोणत्याही शासकीय, राजकीय, मंत्र्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या कोणत्याही कार्यक्रमास परवानगी आपण देऊ नये. आजरा वासियांचे तहसीलदार नगरपंचायतला निवेदन.
आजरा. – प्रतिनिधी.२२
आजरा तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्वात मोठी सुप्रसिद्ध आणि वर्षानुवर्षे चालत आलेली रामतीर्थ यात्रा कोरोनामुळे गेले दोन वर्षे बंद आहे. २०२२ यावर्षीही या यात्रेस परवानगी मिळणार नाही. असे सांगण्यात येत आले. रामतीर्थ येथील यात्रा फक्त धार्मिक विषय नसून यात्रेमुळे गेले दोन वर्षात कोरोणामुळे अडचणीत आलेल्या व्यापारी , छोटे दुकानदार वाहतूकदार यांना आर्थिक घडी सावरण्यासाठी मदत होणार आहे. आपल्याजवळील याच सौंदत्ती देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. त्याचप्रमाणे राज्यात आणि आपल्या तालुक्यात ही विविध राजकीय कार्यक्रम मोठ्या संख्येच्या उपस्थित पार पडत आहेत. अशा परिस्थितीत रामतीर्थ यात्रेला ही मोठ्या उत्साहात पार पडण्यासाठी परवानगी मिळणेस कोणतीही अडचण नसावी. रामतीर्थ येथील यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली पाहिजे अशी तालुक्यातील सर्व लोकांच्यासह व्यापारी व छोटे दुकानदार यांचीही भावना आहे. तरी या सर्व गोष्टींचा विचार करून आपण यात्रा पार पडण्यास परवानगीची कोणतीही अडचण येणार नाही.
वरील सर्व गोष्टींचा विचार करूनही रामतीर्थ यात्रा करण्यास प्रशासनाची परवानगी नसेल तर इथून पुढे कोणत्याही शासकीय अथवा राजकीय अथवा कुठल्याही मंत्र्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या कोणत्याही कार्यक्रमास कोणत्याही प्रकारची परवानगी आपण देऊ नये आणि ति आपण देणार नाही असे मत संतोष बेलवाडे यांनी मांडले, दिगंबर मिसाळ, विनायक चिटणीस, विराज बिल्ले, बाबुराव संकपाळ, सुभाष रामाणे, अभिषेक रोडगी आदी उपस्थित होते.