Homeकोंकण - ठाणेआजरा साखर कारखान्यातील साखर खुल्या बाजारात विक्री सुरू.( सभासद, ऊस उत्पादक, व्यापारी,...

आजरा साखर कारखान्यातील साखर खुल्या बाजारात विक्री सुरू.
( सभासद, ऊस उत्पादक, व्यापारी, पर्यटक व नागरिक यांनी लाभ घ्यावा. )

आजरा साखर कारखान्यातील साखर खुल्या बाजारात विक्री सुरू.
( सभासद, ऊस उत्पादक, व्यापारी, पर्यटक व नागरिक यांनी लाभ घ्यावा. )

आजरा. प्रतिनिधी. २२

आजरा साखर कारखान्याने अनेक अडचणीतून मार्ग काढत जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखाना चालवला आहे. कारखान्याने आज आखेर चांगले ऊस गाळप करून पांढरीशुभ्र साखर उत्पादित केली आहे. कारखाना व्यवस्थापनाने सदर उत्पादित साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद ऊस उत्पादक त्याचप्रमाणे व्यापारी व किराणा दुकानदार यांना मिळावी व आपल्या लोकांना या साखर विक्रीचा आर्थिक लाभ मिळावा या उद्देशाने एक नवीन संकल्पना संचालक मंडळाने आखली आहे. आज भागात पिकणारा घनसाळ जसा विकला जातो तशी आज जरा साखरेची विक्री केली जाणार आहे. सदर साखरे करिता संबंधितांना एक क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त मागणी करणे आहे. यासाठी कारखाना गेट वरती साखर विक्रीचे नियोजन कारखान्यामार्फत करण्यात आले आहे कारखाना चा आजचा भाव एस.३० साखरेचा भाव रु. ३१९० अधिक ५ टक्के जीएसटी प्रति क्‍विंटल मोठी साखर एम. ३० चा भाव ३२७० अधिक ५ टक्के जी. एस. टी. याप्रमाणे ओपन दरात विक्री करण्यात येत आहे. याकरता इच्छुक सभासद व व्यापारी कंत्राटदार अथवा पर्यटक यांनी कारखाना विक्री विभागाशी संपर्क साधून साखर खरेदी करता येईल अशी माहिती कारखान्याचे चेअरमन श्री सुनील शिंत्रे यांनी दिली व दर हे प्रत्येक आठवड्यात बदलत असतात त्यामुळे आपण कारखान्याची संपर्क साधून दराची खात्री करून साखरेची उचल करावी या प्रमाणे दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा चालू असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.
संपर्क.
विष्णू देसाई.- ९४२०००७५३८,
अरुण जाधव –
९४२१२८७७३५

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.