आजरा मनसे पदाधिकारी आढावा बैठक संपन्न. – जि. प. , प. स निवडणूक लढवणार.
आजरा. प्रतिनिधी.
आजरा तालुका मनसे पदाधिकाऱ्यांची दि. २२ रोजी आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मनसे उमेदवार उभे करून ताकदीनिशी लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्याचे संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे, जिल्ह्याचे मनसे नेते पुंडलिकभाऊ जाधव, जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले, जनहित कक्षाचे परशुराम बामणे यांचे सूचनेनुसार व नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुफल, तालुकाध्यक्ष अनिल निऊगरे, जिल्हा उपाध्यक्ष महिला पूनम भादवणकर, तालुकाध्यक्ष सरिता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली दि. २१/२/२०२२ रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. यावेळी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद ३ व पंचायत समितीत ६ जागेवर मनसे उमेदवार उभे करणार आहे व पूर्ण ताकतीने निवडणूक लढणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २७ फेब्रुवारी हा दिवस “मराठी भाषा गौरव दिवस” म्हणून साजरा करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या बैठकीला उपाध्यक्ष आनंदा घंटे तुषार येजरे, सचिव चंद्रकांत सांबरेकर तालुका उपाध्यक्ष महिला तेजस्विनी देसाई सहकार सेना म्हकाळी चौगुले, वसंत घाटगे, प्रदीप पाटील, प्रतिमेस सुकवे, शिवराज लोखंडे, व सर्व पदाधिकारी शाखाध्यक्ष मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.