गर्जना प्रतिष्ठान वतीने नुतन गडहिंग्लज पंचायत समिती. – उपसभापती प्रकाश पाटील यांचा सत्कार.
आजरा. प्रतिनिधी. १७
आजरा वडकशिवाले येथील सामाजिक कला – क्रीडा व संस्कृती क्षेत्रात अग्रेसर भूमिका घेणारे गर्जना प्रतिष्ठान यांच्या वतीने उत्तूर येथील धुरे मंगल कार्यालय या ठिकाणी स्नेंहमिलन कार्यक्रमाचे आयोजन मर्यादित मित्र परिवाराच्या उपस्थित आयोजन केले होते. या स्नेंहमीलन कार्यक्रमासाठी आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, तालुक्यातील भाजप पदाधिकारी तसेच इतर पक्षातील पदाधिकारी व बेलवाडे परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतीच गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झालेले आत्याळ ता. गडहिंग्लज येथील प्रकाश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप भुदरगड तालुका अध्यक्ष नाथाजी पाटील होते. स्वागत वडकशिवाले सरपंच सचिव संतोष बेलवाडी यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश बेलवाडे यांनी केले. श्री.बेलवाडे बोलताना म्हणाले गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना भेटू शकलो नाही समोरा – समोर संवाद साधता आला नाही. म्हणून आज योगायोगाने नूतन उपसभापती गडहिंग्लज पंचायत समिती प्रकाश पाटील यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली यानिमित्ताने आपल्याला सर्वांशी एकमेकाला भेटता आले हा या कार्यक्रमाचा प्रमुख विषय होता. कोणीही याला राजकीय स्वरूप देऊ नये. बेलवाडे म्हणाले.
यावेळी उपसभापती श्री पाटील यांचा सत्कार प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी डॉ. राजेंद्र ठाकुर, मौनी विद्यापीठ अल्केश कांदळकर, आजरा भाजप अध्यक्ष सुधीर, कुंभार, जनार्दन निऊगरे, डॉ. चंद्रकांत परुळेकर, मुरगूड नगरसेवक रवी परीट, विशाल सूर्यवंशी, चंदगड व्यापारी असोसिएशन. श्री. बेनके, सेवा वर्धनी संस्था जि. प्रमुख ( वक्ते )राजेंद्र पाटील, उत्तुर माजी उपसरपंच धोंडीराम सावंत, विकास बागडी, बाबु संकपाळ, महादेव रामाणे, विठ्ठल मुधाळकर
सह पदाधिकारी विविध पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे उपस्थित होते गर्जना प्रतिष्ठान चे अध्यक्ष दिगंबर मिसाळ यांनी आभार मानले.
{ सदर स्नेहमिलन कार्यक्रमात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत उत्तुर जिल्हा परिषद मधील उमेदवारी बाबत घोषणा होणार असल्याची चर्चा होती. परंतु अशा कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा करण्यात आली नाही. परंतु उत्तुर जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. }