Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रचितळे ग्रामस्थांचा उचंगी प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यास विरोध बाबत. - प्रांतअधिकारी सौ. बारवे...

चितळे ग्रामस्थांचा उचंगी प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यास विरोध बाबत. – प्रांतअधिकारी सौ. बारवे यांची चितळे – जेऊर ग्रामस्थ सोबत बैठक संपन्न.
( दोन दिवसात निर्णय देऊ पण काम बंद करु नये ग्रामस्थांना सूचना. – सौ. बारवे प्रताधिकारी.)

चितळे ग्रामस्थांचा उचंगी प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यास विरोध बाबत. – प्रांतअधिकारी सौ. बारवे यांची चितळे – जेऊर ग्रामस्थ सोबत बैठक संपन्न.
( दोन दिवसात निर्णय देऊ पण काम बंद करु नये ग्रामस्थांना सूचना. – सौ. बारवे प्रताधिकारी.)

आजरा. – प्रतिनिधी. १६

उचंगी धरणग्रस्तांना चितळे गायरानातील जागा देण्यास चितळे, जेऊर, भावेवाडी, धरनगरवाडा ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर दि. १५ रोजी चितळे ग्रामस्थ यांनी जमीनसपाटीकरण करण्याचे काम चालू असलेल्या गट नंबर मध्ये काम बंद पाडण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. चितळे ग्रामस्थ आपल्या गट नंबर मधील प्रकल्पग्रस्तांना जमीन न देता दुसरा गट नंबर मधील द्यावी. अशी भूमिका घेऊन ठिया मारला होता. याबाबत तहसीलदार विकास आहिर यांनी काम बंद करता येणार नाही. परंतु आपण प्रांतअधिकारी यांच्याशी चर्चा करावी व यानंतर प्रांतअधिकारी यांचे मत ऐकून आपण निर्णय घ्यावा. पण काम बंद केले जाणार नाही. याबाबत उद्या प्रांतअधिकारी यांना आपले शिष्टमंडळ सोबत बैठक करावी असे ग्रामस्थांना सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दि. १६ रोजी चितळे येथे प्रांत अधिकारी सौ बारवे यांनी चितळे ग्रामस्थ यांची चर्चा केली संजय सांबरेकर, उदय सरदेसाई यांनी चितळे – जेऊर येथील ग्रामस्थांना आपण धरणग्रस्तांना आमच्या गायराणातील जमिनी दिल्या तर आम्हाला भविष्यात कोणत्या अडचणी निर्माण होतील याबाबतची माहिती देऊन आमच्या गायराणातील गट. नंबर वगळता इतर गट नंबर मधील आपण प्रकल्पग्रस्तांना जमीन दिल्यास आमचा कोणताही विरोध नसेल तसेच आपण प्रकल्पग्रस्तांना आमच्या गट नंबर मधील दाखवलेले व प्रकल्पग्रस्तांनी पसंत केलेले ५ प्लॉटचे दिलेले आदेश रद्द करावे. व येथील ग्रामस्थ दाखवतात त्या गट नंबर मधील प्लॉट देऊ करावे. असे ग्रामस्थांच्यावतीने प्रांतअधिकारी यांच्यासमोर म्हणणे मांडले असता.

{ प्रांतअधिकारी सौ. बारवे यांनी याबाबत आपले म्हणणे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यासमोर म्हणणे मांडून दोन दिवसांमध्ये आपल्याला निर्णय कळविण्यात येईल तोपर्यंत आपण कोणत्याही पद्धतीने काम बंद पाडू नये. आपला सकारात्मक विचार केला जाईल असे तोंडी सांगण्यात आले. }

[ याबाबत ग्रामस्थांनी आमचे आंदोलन चालू राहील पण दोन दिवस आम्ही काम बंद पडणार नाही. परंतु आम्ही घेतलेल्या निर्णयानुसार आपला निर्णय योग्य नसल्यास काम बंद करण्याचे आंदोलन सुरू राहील असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. ]

यावेळी तहसीलदार विकास अहिर, सपोनि. सुनिल हारगुडे, सरपंच मारुती चव्हाण, उपसरपंच प्रकाश तर्डेकर, सह ग्रामस्थ मारुती गुरव, प्रकाश घुरे, बंडू सुतार, शामराव दोरुगडे, शिवाजी खवरे, सौ. मनीषा सरदेसाई एकनाथ घुरे तसेच चितळे – जेऊर – भावेवाडी धनगरवाडी येथील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.