राधानगरी तालुक्यातील होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न. – शिवसेना राधानगरी संपर्कप्रमुख दीनानाथ चौगुले.
राधानगरी. प्रतिनिधी.
आजरा – राधानगरी – भुदरगड विधानसभा मतदार संघातील होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी व पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक संपन्न झाली अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर होते. स्वागत तालुका प्रमुख यांनी केले.
येणारी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी इच्छुक उमेदवार कोण कोण आहेत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व अन्य इच्छुक उमेदवार याची चाचणी करून निवडणुकीच्या तयारीला लागल्या बाबतची प्राथमिक बैठक राधानगरी येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आम. श्री अबिटकर यांनी आजरा राधानगरी भुदरगड विधानसभा मतदार संघातील राधानगरी तालुक्यात पदाधिकाऱ्यांनी पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काम करण्याची बोलताना सांगितले राधानगरी संपर्कप्रमुख श्री चौगुले यांनी निवडणूक संदर्भात इच्छुक उमेदवारांची यादी लवकरच चाचपणी करून तयार करण्यात येईल असे सांगितले. यावेळी जि.प.सदस्य रोहिणी आबिटकर सह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.