आमच्या गायरानातील प्रकल्पग्रस्तांना जागा दिल्यास आमची गुर – ढोर , पोर – बाळ जायची कुठं. – चितळे ग्रामस्थांचा ठिया.
आजरा. – प्रतिनिधी.
उचंगी धरणग्रस्तांना चितळे गायरानातील जागा देण्यास चितळे ग्रामस्थांनी विरोध दाखवला आहे. आमच्या गायरानातील गट नंबर मधील जागा वगळता अन्य जागा धरणग्रस्तांना देण्यात यावी आमच्या गायरानातील गट नंबर मधील आपण जर धरणग्रस्तांना जागा दिला तर आमची “गुरंढोरं, पोर – बाळ जायचं कुठं” आम्ही जनावरे चारायची कुठे मुलांनी खेळायचे कुठे असा प्रश्न उपस्थित करत दि १५ रोजी चितळे ग्रामस्थ जमीन सपाटीकरण चालू असलेले काम बंद पाडण्यासाठी चितळे येथील गायरानात मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले होते. याप्रसंगी तहसीलदार विकास अहिर त्यांच्याशी चर्चा करताना चितळे ग्रामस्थ संजय सांबरेकर, उदय सरदेसाई सह ग्रामस्थ यांनी अगोदर काम बंद करा आमच्याशी चर्चा करा, ग्रामस्थ यांची मते ऐकून घ्या व पुढील निर्णय घ्या. अन्यथा आम्ही ग्रामस्थ चालू असलेले काम बंद पाडू अशा पद्धतीची भूमिका मांडत ग्रामस्थांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी तहसीलदार श्री अहिरे म्हणाले कायदा हातात घेऊ नका याबाबत आपण निवेदन देऊन प्रांत अधिकारी यांच्याशी आपले शिष्टमंडळ जाऊन भेटावे चर्चा करावी व काय निर्णय देतात ते पाहावे परंतु कोणत्याही परिस्थितीत काम बंद केले जाणार नाही. असे तहसीलदार यांनी ग्रामस्थांना चर्चेदरम्यान सांगितले. अखेर प्रांतअधिकारी यांना भ्रमणध्वनी म्हणून संपर्क करून दि १६ रोजी शिष्टमंडळ प्रांताधिकारी यांना भेटून चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी चितळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजरा पोलीस स्टेशनचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.