आशा स्वंसेविका व गटप्रवर्तकांचे थकीत वेतन मिळालेच पाहिजे. – आजरा पंचायत समिती समोर निदर्शने.
आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील आशा स्वंसेविका व गटप्रवर्तकांचे चार महिण्याचे थकीत वेतन मिळालेच पाहिजे. या मागणीसाठी दि. १४ रोजी आजरा. पंचायत समिती समोर आशा स्वंसेविका व गटप्रवर्तक यांनी निदर्शने करत गट. विकास अधिकारी बी. डी. वाघ याना आपली व्यथा मांडली. व महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. शहरी व ग्रामीण भागात कृती समितीच्या वतीने कोव्हिड १९ लसीकरण अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक करणार सकाळपासून संध्याकाळपर्यंत सक्तीचे काम लावण्यात येत आहे. याबाबत कोणताही मोबदला अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दिला जात नाही. अशा स्वयंसेवकांची नेमणूक कामावर आधारित मोबदला या तत्त्वावर करण्यात आलेली आहे. कोव्हिड १९च्या कामासाठी केंद्र शासनाकडून मिळणारा एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता हा ऑक्टोबर २०१९ पासून देण्याचे बंद करण्यात आला आहे. तो पूर्ववत देण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत दिवसभरात कोव्हिड १९ च्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे असा स्वामी सेविकांना व गटप्रवर्तक त्यांची मूळ कामे करण्यासाठी अजिबात वेळ नसल्यामुळे त्यांना दरमहा कोव्हिड पूर्वकाळात मिळत असलेला मोबदलयापेक्षा सध्या खूप कमी मोबदला मिळत आहे. त्यामुळे त्यांचे न भरून निघणारे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांना मिळणारा तंटपुंजी मोबदलाही वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे शासन व प्रशासनावर त्यांच्या भावना संतप्त होऊन अशा सेविकांनी व गटप्रवर्तक यांचा मनामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. याकडे ग्रामीण गांभीर्याने लक्ष देऊन थकित वेतन द्यावे अशा आशयाचे निवेदन आजरा येथील महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने गटविकास अधिकारी आजरा यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर ता. अध्यक्ष मंदाकिनी कोडक, तसेच दीपा बुरूड, रुपाली गुरव, सुनिता पाटील, कॉम्रेड प्रकाश कुंभार सह महिलांच्या सह्या आहेत.
( यावेळी आमच्या मागण्या आठ दिवसात महाराष्ट्र शासनाने पुर्ण नाही केलेस मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचे यावेळी बोलताना कॉम्रेड प्रकाश कुंभार यांनी सांगितले.)
