Homeकोंकण - ठाणेआजरा तहसिल कार्यालय शासकीय ७३ वा. प्रजासत्ताकदिन. उत्साहात साजरा.

आजरा तहसिल कार्यालय शासकीय ७३ वा. प्रजासत्ताकदिन. उत्साहात साजरा.

आजरा. प्रतिनिधी. दि. २६.- 

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ व्या वर्धापन दिनोत्सवाचा आजरा तहसिल येथील ध्वजारोहणाचा समारंभ बुधवार दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९.१५ वा. आजरा तहसिल समोर. नायब तहसीलदार डी. डी.कोळी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमास मोजकेच स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आईवडील तसेच कोरोना योध्दा, डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक अशा काही निमंत्रित मर्यादित नागरिकांनी उपस्थीत. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता, प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून संपन्न झाला. सर्वांसाठी मास्क बंधनकारक, ‍सुरक्षित वावराच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी १० मिनिटे आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये. तसेच कोविड- १९ च्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येकांनी मुखपट्टी (मास्क) घालणे, सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक राहील असे आवाहन करण्यात आले होते. यावेळी आजरा सपोनि. सुनिल हारगुडे, आजरा पोलीस स्टेशन स्टाप, तहसिल कार्यालय सर्व अधिकार, कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.