आजी-माजी सैनिक अर्ध सैनिक व पोलिस वेल्फेअर फाउंडेशनचा. – २६ रोजी मडिलगेत उद्घाटन सोहळा संपन्न.
मडिलगे येथील आजी-माजी सैनिक अर्ध सैनिक व पोलिस वेल्फेपर फाउंडेशनचे मडिलगेत फाऊंडेशनच्या कार्यालय व शाखेचे उद्घाटन सोहळा बुधवार २६ जानेवारी रोजी स. ९ वा. आयोजित संपन्न झाला. कार्यालयाचे उद्घाटन मुख्य प्रवर्तक माजी सैनिक गोविंद निऊगरे, यांच्या हस्ते झाले तर नामफलक उद्घाटन माजी सैनिक कृष्णा देसाई यांच्या हस्ते झाले तर माजी सैनिक पत्नी यांच्या हस्ते कार्यालय पूजन करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती सरपंच गणपतराव आरळगुंडकर, उप. सरपंच छाया दोरुगडे, हनुमान समूहाचे प्रमुख के. व्ही येसणे, माजी सरपंच दिपक देसाई, सह ग्रामपंचायत सदस्य तसेच
आजी-माजी सैनिक अर्ध सैनिक व पोलिस वेल्फेअर फाउंडेशनचे
अध्यक्ष. – कृष्णा पाटील, उपाध्यक्ष. नागोजी येसणे- सचिव संभाजी घाटगे, खजिनदार शरद पाटील, संचालक. – कृष्णा देसाई, भगवान पोवार, शिवाजी येसणे, बबन पवार, सुरेश कुऔभार, सखाराम येसणे, केरबा पाटील, अजित येसणे शिवाजी डोंगरे सह सभासद आजी – माजी सैनिक अर्ध सैनिक व पोलिस वेल्फेअर फाउंडेशन , ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी के. व्हि. येसणे, गोविंद निऊगरे यांनी मार्गदर्शन केले.