Homeकोंकण - ठाणेप्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण.पालकमंत्री. ना. जयंत पाटील यांच्याहस्ते.

प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण.पालकमंत्री. ना. जयंत पाटील यांच्याहस्ते.

सांगली. प्रतिनिधी. दि. २४.- 

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ व्या वर्धापन दिनोत्सवाचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ बुधवार, दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.१५ वा. पोलीस परेड ग्राऊंड विश्रामबाग, सांगली येथे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते संपन्न होणार आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमास मोजकेच स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आईवडील तसेच कोरोना योध्दा जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक अशा काही निमंत्रित मर्यादित नागरिकांनी उपस्थित रहावे. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता, प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून करावयाचा आहे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. ‍सुरक्षित वावराच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे व अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी नागरिकांनी बेवसाईटव्दारे होणारे थेट प्रक्षेपण पहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी १० मिनिटे आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये. तसेच कोविड- १९ च्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येकांनी मुखपट्टी (मास्क) घालणे, सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक राहील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.