आजरा. प्रतिनिधी.
माजी विद्यार्थी मडीलगे व संवेदना फौंडेशन, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने मडीलगे येथे दि ९ जानेवारी २०२२ रोजी मोफत वैद्यकीय महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका हा दुर्गम असून अनेक रुग्ण आजारापासून त्रस्त असतात परंतु आर्थिक दुर्बलतेमुळे त्यांना उपचार घेता येत नाहीत. त्यांच्यासाठी हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात ईसीजी, मधुमेह, रक्तदाब, शरीरातील कॅल्शियम पातळी आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. परिसरातील नागरिकांनी या शिबिरास मोठ्या संख्येने हजेरी लावत आरोग्य तपासणी करून घेतली. सदर शिबिरा यशस्वी करण्यासाठी १६ डॉक्टर, ८ नर्स स्टाफ , ४ आशा सेविका, २ लॅब टेक्निशियन, ४ फार्मासिस्ट आणि १८ स्वयंसेवक हजर होते. या शिबिरात एकूण ३८७ पेशंट ची तज्ञ डॉक्टर स मार्फत तपासणी करण्यात आली. सदर शिबिरासाठी शल्य चिकित्सक शैलेंद्र सावंत , मेडिसिन तज्ञ डॉ. अमोल पोवार, दंत तज्ञ डॉ.आनंद पाटील, नेत्ररोग तज्ञ डॉ. युवराज सुतार, घसा-कान-नाक तज्ञ डॉ. मुकुंद जाधव, स्त्री रोग तज्ञ डॉ. रश्मी राऊत , होमिओपॅथी तज्ञ डॉ. स्मितेश देसाई तसेच संवेदना फौंडेशन व मडीलगे येथील सर्व डॉक्टरस यांच्या मार्फत आलेल्या नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबीर दरम्यान गरजू नागरिकांना जवळपास १ लाख रुपये किमतीच्या औषधांचे वाटप मोफत करण्यात आली. तसेच रक्तातील हिमोग्लोबिन आणि कॅल्शिअम चे प्रमाण कमी असणाऱ्या महिलांना आवश्यक त्या गोळ्यांचा डोस ही देण्यात आला.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी कै. केदारी रेडेकर नर्सिंग कॉलेज, गडहिंग्लज, महालॅब गडहिंग्लज, ग्रामीण रुग्णालय आजरा, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, प्राथमिक उप-आरोग्य केंद्र मडिलगे, प्राथमिक आरोग्य केंद्र भादवण, ग्रामपंचायत मडिलगे आणि संवेदना सभासद तसेच माजी विद्यार्थी, मडीलगे यांचे बहुमूल्य योगदान लाभले. या आरोग्य शिबिराचे संपूर्ण नियोजन हे संतोष पाटील, दया येसणे, गणेश देसाई, महेश पाटील, पांडुरंग मोहिते, राकेश वांगणेकर, रत्नाकर कातकर यांनी पाहिले. या आरोग्य शिबिराचे आजरा तालुक्यात कौतुक होत आहे.