संपादकीय. वार्तापत्र.
राज्यातील काही जिल्ह्यातील काहीच तालुक्यात मनसेची आंदोलने चालू असतात परंतु जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी फक्त ठराविक शहरापुरते, तालुका मर्यादित काम न करता आपल्याला ज्या विभागात जबाबदारी दिली आहे. पूर्ण केली पाहिजे. परंतु असे होताना दिसत नाही. पक्षाची ध्येयधोरणे मतदारापर्यंत पोचवली नाहीतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मतपेटीत काय. यासाठी अशी खळखट्याक फक्त आंदोलन करून पक्ष मागणी होत नाही. आंदोलने देखील केली पाहिजेत पण अगोदर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी पक्षबांधणीसाठी प्रत्यक्षात काम केले पाहिजेत. राज्यात डोळ्यासमोर स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर संघटन बांधणी नसेल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून एंट्री मिळणार नाही. फक्त प्रशासनावर वचक, पक्षश्रेष्ठींना आपण काम करत असल्याचे दाखवून सामान्य कार्यकर्त्यावर वजन ठेवून आपण जर आंदोलनाचा पवित्रा घेतला तर पक्षबांधणी होत नाही. फक्त स्वतःची बांधणी होईल व सध्या होत आहे. असं चित्र कोल्हापूर जिल्ह्या सह राज्यातील काही जिल्ह्यात दिसत आहे. पक्षाच्या दृष्टीने हे पोषक नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मनसेचे अनेक शिलेदाराचे यांचे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. यामध्ये प्रामुख्याने मनसे पदाधिकारी वसंत मोरे, अविनाश जाधव, संदीप देशपांडे, आम. राजू पाटील यांचे सह अनेक पदाधिकारी मनसैनिक हे काम राज्यातील मनसैनिकांना आदर्श देणारे करत आहेत. परंतु ते मताच्या पेटीत परिवर्तन का. ? होत नाही. याचं चिंतन करणे देखील गरजेचे आहे. सद्या झालेल्या निवडणुकांच्या धामधुमीतही गोंधळलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ‘इंजिन’ नगरपंचायतींच्या निवडणुकीत घसरले असून, या निवडणुकांतील दीड हजारांहून अधिक जागांपैकी जेमतेम चारच जागांवर मनसेचे नगरसेवक निवडून आले आहेत. तिकिट वाटपापासून प्रचारातील ढिसाळपणा आणि गटतटामुळेच मनसेला पुन्हा एकदा पराभवाचा धनी ठरवावे लागल्याचे स्पष्ट आहे.
मनसेची ताकद असलेल्या नाशिक जिल्ह्यात तर एकाच जागेवर समाधान मानावे लागले तर यवतमाळमध्ये दोन जागा मिळाल्या आहेत. आगामी निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने संघटनात्मक बांधणी करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पूत्र अमित यांना खूपच मेहनत घ्यावी लागणार हेच या निकालाने दाखवून दिले आहे.
राज्यभरातील ९७ नगरपंचायतींच्या एक हजार ६३८ जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. त्यात, काही जिल्ह्यांत धक्कादायक निकाल आल्याने कोणाला कोठे यश आणि अपयश मिळाले ? यावरून चर्चा रंगत आहेत. या निकालावरूनच आगामी निवडणुकांचे अडाखे बांधले जात आहेत. सर्वाधिक कमी म्हणजे, चारच जागांवर मनसेला यश मिळाल्या असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील कळवण नगरपंचायीत एक आणि यवतमाळ जिल्ह्यातील मरेगाव नगरपंचायतीत दोन आणि झरी जामणीत १ अशा चौघा नगरसेवकांचा समावेश आहे.
एकेकाळीच्या बालेकिलल्यात अर्थात नाशिक शहरात पुन्हा बस्तान बसविण्याच्या तयारीत असलेल्या मनसेने जिल्ह्यातही ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या निवडणुकांमध्ये किमान नाशिक जिल्ह्यातील काही नगरपंचायतीत मनसेचे इंजिन धावण्याची आशा होती. परंतु, एक जागा मिळाल्याने संघटनेत पुन्हा नैराश्य पसरण्याची भीती आहे. यवतमाळध्ये दोन नगरपंचायतीत तरी तीन जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला आहे. एकेकाळीच्या बालेकिलल्यात अर्थात नाशिक शहरात पुन्हा बस्तान बसविण्याच्या तयारीत असलेल्या मनसेने जिल्ह्यातही ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या निवडणुकांमध्ये किमान नाशिक जिल्ह्यातील काही नगरपंचायतीत मनसेचे इंजिन धावण्याची आशा होती. परंतु, एक जागा मिळाल्याने संघटनेत पुन्हा नैराश्य पसरण्याची भीती आहे. यवतमाळध्ये दोन नगरपंचायतीत तरी तीन जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला आहे. आत्ता गरज आहे ती मनसेचे इंजन व इंजिनाचे नेतृत्व करणार नेतृत्व म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत, मतदारापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. यासाठी मागील विधानसभेचा निकाल डोळ्यासमोर ठेवून राज्यातील प्रमुख पदाधिकारी व मनसे अध्यक्ष यांनी महाराष्ट्रातील जिल्ह्याचे दौरे आतापासूनच केले पाहिजेत. अन्यथा………….
क्रमशा.