आजरा. प्रतिनिधी.
कोवाडे आजरा येथील सिध्दीविनायक महिला दूध संस्थेच्या निवडणुकीत १५ वर्षाच्या सत्तेला धक्का देत परिवर्तन आघाडीला यश मिळाले आहे. रविवार दि. २३ रोजी मतदान झाले. ९१ मतदान होते. ११ जागेसाठी हि निवडून होती. एक जागा सत्ताधारी यांची बिनविरोध झाली होती. यामध्ये परिवर्तन आघाडीचे १० जागेवर यश मिळाले आहे.
विरोधी परिवर्तन आघाडीच्या महिला आघाडी यांनी आनंद उत्सव साजरा केला. निवडणूक अधिकारी म्हणून अनिल चिकणे यांनी काम पाहिले.