आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील चैतन्य सृजन व सेवा संस्थेचे महिलांसाठी आरोग्य शिबीर दि. १८ व १९ जानेवारी रोजी आयोजित केले होते. सदर शिबिर रक्तातील कमतरता कंप्लिक हिमो ग्राम कॅल्शियम व शुगर या घटकांची तपासणी करण्यात आली त्यासाठी उमेश पारपोलकर सुरज लाॅबोरेटरी यांनी सहकार्य केले. रक्तातील हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम कमी असणाऱ्या महिलांना आवश्यक या गोळ्यांचा डोस देण्यात आला. त्यासाठी डॉ. अंजली देशपांडे व डॉ. रश्मी राऊत ( गाडगीळ) यांनी संबंधित महिलांना औषधे उपचार सुचवले याकामी सुधा उपासे यांनी सहकार्य केले या शिबिरात सामान्यपणे १२५ महिला सहभागी झाल्या होत्या शिबिर यशस्वी करण्यासाठी नेहा पाटील, माधुरी पाचवडेकर, पूनम बुरुड सुचिता गड्डी, महादेव गावडे, सुवर्ण सटाले, त्यांनी निरोप विशेष सहकार्य केले. शिबिराचे उद्घाटन डॉ. सौ देशपांडे यांनी केले आरोग्य शिबिराचे संयोजक डॉ.प्रा शिवशंकर उपासे, संतोष जाधव निकिता स्वामी संजय तेजम, सुभाष पाटील व तुषार येरुडकर यांनी केले.