आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नुकत्याच झालेल्या मराठी पाट्या लावाव्याया शासन निर्णयानुसार आजरा शहरातील व ग्रामीण भागातील काही व्यापारी लहान-मोठे दुकानदार यांनी अद्याप इतर भाषेतील पाट्या वापरलेल्या आजही दिसत आहेत. या अनुषंगाने आजरा मनसे यांनी आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की. एकीकडे मुंबईसह राज्यभरात मराठी वाचवा मोहीम सुरू असताना महाराष्ट्रातील काही व्यापारी महाराष्ट्रात राहून आपल्या दुकानांवरील पाट्या मात्र मराठीत नसतात या गोष्टीचा मनसे प्रथम निषेध करत आहे सन्मानीय मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांना पक्ष स्थापनेपासून इतर भाषिक फाट्या हटवण्याची मोहीम हाती घेतली होती आता तर सध्या थेट मंत्रालयातून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देखील काही व्यापारी जाणीवपूर्वक मराठीत पाट्या लावत असल्याचे दिसून येत असल्याने आजरा शहरासह ग्रामीण भागात आम्ही दुकानदार मनसेच्या वतीने विनंती करत आहोत. की आपल्या दुकानावरिल मराठीत नसतील पाट्या येत्या दोन दिवसात मराठीत लावण्यात याव्यात आमच्या मनसे पदाधिकारी यांना आपल्या दुकानांवरील पाट्या अन्य भाषेत निदर्शनास आल्यास होणाऱ्या परिणामास मनसे पदाधिकारी जबाबदार असणार नाहीत याची नोंद घ्यावी. याबाबत आपल्या कार्यालयाकडून अशा संबंधित दुकानदार यांना सूचना द्याव्यात कारण हे कायदा हे व्यापारी हातात घेत आहेत मंत्रालयातून आदेश आलेला आहेत त्यामुळे आपल्या स्तरावर सदर दुकानदार यांना नोटीस देण्यात यावी असे दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, महिला आघाडी उपाध्यक्ष पुनम बारवकर आजरा तालुका अध्यक्ष अनिल निऊगरे, तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे, प्रकाश कांबळे, वि. सेना तालुका अध्यक्ष अश्विनी राणे, महिला आघाडी अध्यक्ष सरिता सावंत उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई, सचिव चंद्रकांत सांबरेकर सह वैष्णवी दळवी सह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.