आजरा. प्रतिनिधी. १६.
जिल्हा बँक चेअरमन कोण हे दि २० रोजी होणाऱ्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होईल तो मान्य असेल आजरा येथील के.डी.सी नूतन संचालक सुधिर देसाई व सर्व ठरावधारक यांचा सत्कार सोहळा वेळवट्टी येथील विविध संस्था व तरुण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री. नाम हसन मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील होते. प्रास्ताविक आजरा शेतकरी संघाचे मॅनेजर जनार्दन बामणे यांनी केले. नाम. मुश्रीफ पुढे बोलताना म्हणाले जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत १५ लाख रुपये घेऊन नोकरी १५ लाख देऊन ठराव अशा प्रकारची आमिषे असताना देखील सर्व ठराव धारकांनी एकमताने सुधीर देसाई यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना विजय केला हीच खरी राजाराम बापूना श्रद्धांजली म्हणावी लागेल आपल्या सर्वांचे आभार
[ या जिल्हा बँक निकालाबाबत माजी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणत आहेत. अशोक चराटीना पाडून विश्वासघात केला. तर ही पॅनलची रचना निवडणूक असते ज्या उमेदवाराकडे ठराव जास्त उमेदवार विजयी होतो. माजी मंत्री श्री पाटील यांना यामधील ज्ञान नाही त्यांनी आपल्या ज्ञानात भर घालून सुधारणा केली पाहिजेत असा टोला लगावला. ]
कार्यक्रमाचे अध्यक्ष आम. श्री पाटील म्हणाले चेअरमन होणार नाही हे आपलं वक्तव्य बँकेच्या हिताचे नाही सर्व संचालकांचे मत आहे. आपणच या जिल्हा बँकेचे चेअरमन व्हावे. तसेच आजरा तालुक्यातील प्रलंबित रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी व पाण्यापासून वंचितांना पाणी देण्यास आम्ही कमी पडणार नाही जुन अखेर घळभरणीचे काम कोणत्याही चालू होईल यासाठी पोलिस बंदोबस्त घ्यावा लागला तरी चालेल पण पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. मतदार संघातील आजरा मधील येणारा एक मतदारसंघ या मतदारसंघाला निधी कमी पडू देणार नाही असे आम. श्री.पाटील म्हणाले. सत्कारमूर्ती नूतन संचालक सुधीर देसाई म्हणाले. पैशाचे व नोकरीचे आमिष असतानादेखील सर्व ठराव धारकांनी मला मतदान केले तसेच मुकुंदादा देसाई यांनी मनाचा मोठेपणा दाखवत एक पाय मागे घेत माझ्या उमेदवारी शिफारस केली. व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला या निवडणुकीमध्ये विजय केला ही बापुना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली म्हणावी लागेल यापुढे काम करत असताना पूर्वीच्या संचालकांच्या दुर्लक्षामुळे दीर्घ मुदतीची प्रकरणे थकीत राहिले आहेत. ती लवकरच मार्गी लावणार आहे. तर उचंगी व सर्फनाला हे दोन्ही प्रकल्प प्रलंबित असून त्यांचा पाठपुरावा लवकर झाल्यास आपल्या आजरा कारखान्यासाठी चांगल्या पद्धतीने ऊस पुरवठा होऊन कारखाना स्वयंपूर्ण होत. विकासाकडे वाटचाल करेल यासाठी या दोन्ही प्रकल्पांची कामे त्वरित व्हावीत अशी मागणी करत सर्व ठराव धारकांचे आभार मानले.
( यावेळी सर्व ठराव धारकास सोबत दोन महिन्यापासून मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. )
याप्रसंगी वसंतराव धुरे, उदयराज पवार, मुकुंद देसाई, नूतन संचालक भैया माने, सौ. स्मिता दळवी, तसेच ए.म.के देसाई, विष्णुपंत केसरकर, सर्व ठराव धारक, ग्रामस्थ, विविध संस्थेचे चेअरमन तरुण मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गिलबिले सर यांनी केले अभार प्रकाश पवार यांनी मानले.
